छत्रपती संभाजीनगर Samruddhi Highway Accident : नादुरुस्त कंटेनरला कार धडकल्यानं झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले. ही घटना समृद्धी महामार्गावर कोपरगाव परिसरातील धोत्रे गावाजवळ शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. या घटनेत भाऊसाहेब पैठणे, राहुल राजभोज आणि उमेश उगले या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जालन्यावरुन शिर्डीकडं जात असताना हा भीषण अपघात झाला. थांबलेल्या कंटेनरचा अंदाज न आल्यानं कार कंटेनरवर जाऊन आदळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बंद पडलेल्या कंटेनरला धडकली कार : जाफराबाद इथले भाऊसाहेब पैठणे, राहुल राजभोज आणि उमेश उगले आणि दोन जणांसह शिर्डीकडं जात होते. यावेळी कोपरगाव परिसरातील धोत्रे गावाजवळ त्यांची कार क्रमांक एस एच 21, बीएफ 9248 ही भरधाव जात होती. यावेळी समृद्धी महामार्गावर कंटेनर बंद पडलेला होता, त्याचा अंदाज कारचालकाला आला नाही. या कंटेनरमधून चॅनेल खाली पडला होता. तो उचलण्यासाठी कंटेनर चालक खाली उतरला होता. त्याचवेळी भरधाव जाणारी कार बंद पडलेल्या कंटेनरवर जाऊन धडकल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात भाऊसाहेब पैठणे, राहुल राजभोज आणि उमेश उगले यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इतर दोघांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना अगोदर वैजापूर आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
भरधाव कारची धडक अगोदर कंटेनर चालकाला : समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील धोत्रा गावाच्या परिसरात रात्री 11 वाजताच्या सुमारास कंटेनर बंद पडलेला होता. त्या कंटेनरमधून चॅनेल खाली पडल्यानं ते उचलण्यासाठी कंटेनर चालक खाली उतरला होता. यावेळी भरधाव जाणाऱ्या कार कंटेनरवर जाऊन आदळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :