ETV Bharat / state

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना गुजरातमधून अटक, मुंबईत विमानानं आणून आज होणार चौकशी - Salman Khans house firing case - SALMAN KHANS HOUSE FIRING CASE

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळी करण्याच्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेनं दोन आरोपींना गुजरातमधून अटक केली आहे. या दोन्ही आरोपींची आज चौकशी होणार आहे.

Salman Khans house firing case
Salman Khans house firing case
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 16, 2024, 6:36 AM IST

Updated : Apr 16, 2024, 2:17 PM IST

मुंबई: अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यांना अटक करण्यात मुंबई गुन्हे शाखेला ४८ तासात यश आलं आहे. आरोपींना गुजरामधील भूजमधून अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली. विकी गुप्ता आणि सागर पाल अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींची चौकशी करण्याकरिता त्यांना आज मुंबईत आणण्यात येणार आहे. हे दोन्ही आरोपी बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

रविवारी पहाटे अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. दोन हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत अभिनेता सलमान राहत असलेल्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर चार गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांनी दुचाकीवरून पळ काढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कैद झाली.

गोळीबाराचा उद्देश काय होता? अटकेतील दोन्ही आरोपींना आज सकाळी आठ वाजता विमानानं गुजरातवरून मुंबईत आणण्यात येणार आहे. आज सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी हे विमान मुंबई विमानतळावर दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन्ही आरोपींचा लॉरेन्स बिश्नोई गॅंगशी संबंध असल्याची माहिती देखील समोर येत आहे.दोन्ही आरोपीनं सलमान खानच्या घराबाहेर गोळ्या झाडण्यामागे नेमका काय उद्देश होता?सलमान खानला जीवे मारण्याचा उद्देश होता का? दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी हे दुष्कृत्य केले आहे का, याबाबत दोन्ही आरोपींची चौकशी केली जाणार आहे.

गुजरात पोलिसांनी काय सांगितलं?- पश्चिम कच्छचे स्थानिक पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. दोन्ही आरोपींना लखपत तालुक्यातील माता का मढ येथून अटक करण्यात आली आहे. आरोपींना मुंबई पोलिसांकडं सुपूर्द करण्यात आलं आहे. पश्चिम कच्छचे पोलीस महासंचालक महेंद्र बागडिया म्हणाले, सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे दोन्ही आरोपी पश्चिम कच्छमध्ये पळून आले होते. पश्चिम कच्छचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे दोन्ही आरोपींना अटक केली. पुढील तपसासाठी आरोपींना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस पुढील चौकशी करणार आहेत. त्यांना विमानानं मुंबईत नेण्यात येणार आहे. कच्छ पोलिसांनी विविध कलमान्वये आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तीन जणांची पोलिसांकडून चौकशी- याबाबत पोलिसांकडून माध्यमांना देण्यात आलेली माहिती अशी की, सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे दोन्ही मोटारसायकलस्वार आरोपी नवी मुंबईतील पनवेल भागात सुमारे महिनाभर भाड्याच्या घरात राहत होते. त्याच परिसरात सलमानचे फार्महाऊस आहे. दिवसभरात पोलिसांनी या घटनेसंदर्भात नवी मुंबईतील तीन जणांची चौकशी केली. या चौकशीत घराचा मालक, गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीचा पूर्वीचा मालक, विक्रीसाठी सोय करणारा एजंट आणि इतर अनेकांचा समावेश आहे.

दुचाकी सोडून रिक्षानं गेले- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर सलमानच्या घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या माउंट मेरी चर्चजवळ मोटरसायकलवरून निघून गेले होते. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल माऊंट मेरी चर्चजवळ सोडली. त्यानंतर काही अंतर चालून ऑटोरिक्षा घेऊन वांद्रे रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचले. आरोपी बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढले. पण सांताक्रूझ रेल्वे स्टेशनवर उतरले.

पथके विविध राज्यात रवाना- गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल नवी मुंबईतील पनवेल परिसरात राहणाऱ्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत असल्याचं पोलिसांनी सांगितले. या व्यक्तीनं नुकतीच मोटारसायकल दुसऱ्या व्यक्तीला विकली होती. तपासासाठी बिहार, राजस्थान आणि दिल्लीला पोलिसांची पथके गेली आहेत. पोलीस इतर अनेक लोकांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही छाननी केली जात आहे. अज्ञात आरोपींविरोधात पोलिसांनी भांदवी कलम 307 म्हणजेच हत्येचा प्रयत्न आणि सशस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंदिवला आहे.

सलमानला आहे वाय प्लस सुरक्षा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता सलमान खानशी फोनवरून चर्चा केली. अभिनेत्याची सुरक्षा वाढविण्याचे मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश दिले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना लवकरच अटक होईल, अशी ग्वाही दिली होती. लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी ब्रारकडून जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर राज्य सरकारकडून सलमान खानला नोव्हेंबर २०२२ पासून वाय प्लस सुरक्षा पुरविलेली आहे. त्याशिवाय त्याला वैयक्तिक शस्त्र सोबत बाळगण्याची परवानगी दिलेली आहे.

आरोपींची आज होणार चौकशी- सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याच्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडं आल्यानंतर १० पोलिसांचे पथके नेमण्यात आली. या पथकांकडून सीसीटीव्हीच्या मदतीनं संशयित हल्लेखोरांचा शोध घेण्यात आला. त्यात पोलिसांना यश आल्याचं दिसत आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार गुजरामधीन भूजमधून दोन आरोपींना सोमवारी रात्री अटक करण्यात आली. त्यांची चौकशी करण्याकरिता त्यांना आज मुंबईत आणलं जाणार आहे. आरोपींनी दुचाकीवरून येताना हेल्मेट घालून ओळख लपविली होती. त्यांनी नियोजनबद्ध गोळीबार केल्याचं दिसून आलं.

हेही वाचा-

  1. सलमान खान गोळीबार प्रकरण; 1 महिन्यापासून पनवेलमध्ये राहत होते आरोपी; गुजरातमधून हलली गोळीबाराची सूत्रे - Salman Khan Firing Incident
  2. सलमान खान गोळीबार प्रकरण : मुंबई पोलिसांनी 3 संशयितांना घेतलं ताब्यात - Salman Khan Firing Case
  3. सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबारात वापरलेली दुचाकी रायगडमधील, तर सुपारी 'या' कुख्यात गुंडानं घेतल्याचं उघड - Salman Khan Firing Case

Last Updated : Apr 16, 2024, 2:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.