ETV Bharat / state

सलमान खान गोळीबार प्रकरण; 1 महिन्यापासून पनवेलमध्ये राहत होते आरोपी; गुजरातमधून हलली गोळीबाराची सूत्रे - Salman Khan Firing Incident - SALMAN KHAN FIRING INCIDENT

Salman Khan Firing Incident : 14 एप्रिलच्या पहाटे सलमान खानच्या बांद्रा येथील राहत्या घरावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. आता या गोळीबार प्रकरणातील दोन अज्ञात आरोपी हे 1 महिन्यापासून पनवेलमध्ये राहत असल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. या प्रकरणाची गंभीरता समजून घेत ही केस आता क्राइम ब्रांचकडं ट्रान्सफर करण्यात आलीय. त्यामुळं आता या प्रकरणात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.

Salman Khan Firing Incident
सलमान प्रकरण गोळीबार प्रकरण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 10:49 PM IST

मुंबई Salman Khan Firing Incident : गेल्या काही वर्षांपासून निनावी पत्रासह मेलवरुन जिवे मारण्याची धमकी मिळत असलेल्या बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील 'गॅलेक्सी' या घरासमोरच दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी गोळीबार केल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या गोळीबाराच्या वेळेस सलमान हा त्याच्या घरी होता. आरोपींची तीन राउंड फायर केले असून एक गोळी गॅलरीतील पडदा छेदून घरात आली. तर एक भितींला लागली. मात्र, सुदैवानं या गोळीबारात कोणीही जखमी झालं नाही.

1 महिन्यापासून पनवेलमध्ये राहत होते आरोपी : या गोळीबाराच्या घटनेची मुख्यमंत्र्यांसह पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेतली आहे. तर पळून गेलेल्या अज्ञात आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरु करण्याचं आदेश स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएसला दिले आहे. याप्रकरणी पोलिसांची वीस पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके दिल्ली, जयपूर, बिहारसह मुंबई, पुणे, नाशिक, रायगडपर्यंत गेली असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गोळीबारामागे बिष्णोई गॅंगवर पोलिसांचा संशय आहे. गोळीबार करणारे दोन्ही आरोपी पनवेल येथील घरात भाड्यानं गेल्या एका महिन्यापासून राहत असल्याची माहिती, गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी दिलीय. तसेच त्यांनी पुढील तपास सुरु केला आहे.

गोळीबार करणाऱ्या व्यक्तीच्या बाईकचा तपास : पनवेल येथे भाड्याच्या घरात राहून सेकंड हँड हिरो पॅशन हि बाईक दोघांनी विकत घेतली. त्या बाईकवरून पनवेलहून वांद्रे गाठलं. गोळीबारासाठी ज्या बाईकचा वापर केला होता. त्या बाईकच्या मालकापर्यंत मुंबई पोलीस पोहोचले असून गोळीबार करणाऱ्या व्यक्तीची बाईक रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील रहिवासी असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. ती बाईक त्या व्यक्तीकडून दुसऱ्यानं खरेदी केली होती. पोलीस पहिल्या दुचाकी मालकापर्यंत पोहोचले आहेत. त्याने ही बाईक विकल्याचं उघड झालंय. मात्र, आरोपी बाईक मालकाकडं कोणाच्या सांगण्यावरून गेला?, बाईक विकली जाणार असल्याची माहिती कोणी दिली? याचा तपास पोलीस करत आहेत.

सलमानच्या घराबाहेर पोलिसांची गाडी नव्हती : सलमानला 'वाय प्लस' एस्कॉर्ट सिक्युरिटी असूनही पहाटे 4:50 वाजता गोळीबार झाला तेव्हा पोलिसांची एस्कॉर्ट गाडी तेथे नव्हती. त्यामुळं मुंबई पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे. जर पोलिसांची एस्कॉर्ट वाहन घराबाहेर असले असते तर त्या गाडीनं पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपींचा माग काढण्यासाठी पाठलाग केला असता. मात्र, पोलिसांची गाडी सलमानच्या घराबाहेर नसल्यानं 'वाय प्लस' सिक्युरिटीतील त्रुटी सर्वांसमोर आल्या आहेत. 4:50 गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी 5 वाजता पोलीस कंट्रोल रूमला माहिती दिली. त्यानंतर वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलीस सव्वा पाचला घटनास्थळी दाखल झाले.

गोळीबार करण्यापूर्वी रेकी : मुंबई पोलिसांच्या तपासात हा आरोपी एका महिन्यापासून पनवेलमध्ये राहत असल्याचं समोर आलंय. बाईक विकत घेतल्यानंतर त्यांनी एकदाच नव्हे तर अनेक वेळा त्या बाइकचा वापर केल्याची माहिती समोर आलीय. वांद्रे येथून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक रस्ताची माहिती काढली होती. विशेषतः निर्जन रस्त्यांची पाहणी केली म्हणून आरोपींनी माउंट मेरीचा रस्ता निवडला जिथून त्याने सहजपणे बाइक पार्क केली आणि नंतर रिक्षात बसून पळून गेले.

ऑटो पोलिसांच्या रडारवर : पोलीस तपासात समोर आलं आहे की, गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार केल्यानंतर आरोपी माऊंट मेरी येथे पोहोचले. तेव्हा त्यांनी बाईक सोडली आणि ऑटो रिक्षा घेऊन वांद्रे रेल्वे स्टेशनला गेले, त्यानंतर ट्रेन पकडली आणि सांताक्रूझ स्टेशनवर उतरले. तेथून वाकोला येथे गेले. नंतर एक ऑटो रिक्षा पकडून दहिसरच्या पुढे गेले. पण वाकोल्याला पोहचेपर्यंत पोलीस आरोपींचा पाठलाग करू शकले नाहीत. दरम्यान, हे प्रकरण वांद्रे पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.

कसे पळाले आरोपी : पहाटे 4:50 वाजण्याच्या सुमारास सलमानच्या घरावर गोळीबार झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यानंतर आरोपींनी मेहबूब स्टुडिओ रोडवर जाऊन ऑटोचालकाला हायवेचा मार्ग विचारला. मात्र, स्टुडिओ सर्कल ते माउंट मेरी पर्यंत एक फेरी मारली. नंतर बाईक सोडली आणि वांद्रे स्टेशन ऑटो रिक्षानं गाठलं. दोन्ही आरोपींनी सकाळी 5.08 वाजता वांद्रे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून बोरिवलीला जाणारी लोकल पकडली होती. सायंकाळी 5.13 वाजता तो सांताक्रूझ स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर उतरले, हे फुटेजही पोलिसांना मिळाले. सांताक्रूझ रेल्वे स्थानकातून ते पूर्वेला वाकोल्याच्या दिशेने निघाला आणि तिथून एक ऑटो पकडली. आता पुढील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

आज गुन्हे शाखेच्या सर्व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक : या बैठकीत सर्व उच्चस्तरीय अधिकारी सहभागी झाले होते. मुंबई क्राइम ब्रँचची अनेक पथक सध्या मुंबईबाहेर आहेत. ही पथकं दिल्ली, जयपूर, बिहारसह मुंबई, पुणे, नाशिक, रायगडपर्यंत आरोपींचा माग काढत आहे. या बैठकीत सलमानच्या सुरक्षेचाही आढावा घेतला गेला आहे. मुंबई क्राईम ब्रँच तीन जणांची चौकशी करत आहे. सलमानच्या सुरक्षेच्या पथकात अतिरिक्त पोलीस वाढवण्यात आले असून गॅलेक्सीवर पोलिसांची गस्तही वाढवण्यात आलीय. मुंबई पोलिसांकडून सलमान खानच्या सुरक्षेत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयात गुन्हे शाखेची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे.

हेही वाचा -

  1. महाराष्ट्रात गोळीबारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ; का होतायेत गोळीबार? कोण जबाबदार? - Firing Cases In Maharashtra
  2. सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबारात वापरलेली दुचाकी रायगडमधील, तर सुपारी 'या' कुख्यात गुंडानं घेतल्याचं उघड - Salman Khan Firing Case
  3. सलमान खान गोळीबार प्रकरण : मुंबई पोलिसांनी 3 संशयितांना घेतलं ताब्यात - Salman Khan Firing Case

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.