ETV Bharat / state

पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव दौऱ्यावर; 11 लाख 'लखपती दीदीं'ना प्रमाणपत्र वाटप, महिलांसोबत साधला संवाद - PM Narendra Modi Visit Jalgaon - PM NARENDRA MODI VISIT JALGAON

PM Narendra Modi Visit Jalgaon : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (25 ऑगस्ट) महाराष्ट्र दौऱयावर आहेत. जळगाव येथे 11 लाख 'लखबती दीदीं'ना पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. यावेळी मोदींनी महिलांशी संवाद साधला.

PM Narendra Modi Visit Jalgaon
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Source : ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 25, 2024, 10:14 AM IST

Updated : Aug 25, 2024, 2:11 PM IST

छत्रपती संभाजीनगर/जळगाव PM Narendra Modi Visit Jalgaon : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. जळगाव येथे मोदींच्या हस्ते 11 लाख 'लखपती दीदीं'ना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. याआधी पंतप्रधान मोदींनी तिथे उपस्थित असलेल्या महिलांसोबत संवाद साधला. जळगावमधील प्राईम इंडस्ट्रियल पार्क येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्तानं भाजपाचा विधानसभा निवडणुकीचा प्रचार देखील सुरू झाला, अशी शक्यता आहे.

पंतप्रधानांनी नेपाळ बस दुर्घटनेतील मृतांना वाहिली श्रद्धांजली : "नेपाळ बस अपघाताबद्दल मी दु:ख व्यक्त करतो. या दुर्घटनेत जळगावतील अनेक लोकांचा मृत्यू झाला. मी सर्व शोकग्रस्त कुटुंबांप्रती शोक व्यक्त करतो. हा अपघात होताच केंद्र सरकारनं तातडीनं नेपाळ सरकारबरोबर संपर्क केला. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना लगेच नेपाळला जाण्यास सांगितलं. वायू सेनेच्या विशेष विमानानं मृतदेह जळगावला आणले. या दुर्घटनेत जखमी झालेले नागरिक लवकर बरे होतील, अशी प्रार्थना करतो. तसंच या सर्व नागरिकांच्या कुटुंबासोबत केंद्र आणि राज्य सरकार उभं आहे," असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं.

स्त्री शक्तीचं कौतुक : "भारतातील महिला शक्तीनं समाज आणि राष्ट्राचे भविष्य घडवण्यात नेहमीच मोठं योगदान दिलं. आज जेव्हा आपला देश विकसित होण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे, तेव्हा पुन्हा एकदा स्त्री शक्ती पुढं येत आहेत," असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्त्री शक्तीचं कौतुक केलं.

खडसे कार्यक्रमाला जाणार नाहीत : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर आले असून लखपती दीदी प्रशिक्षण सत्र आणि मेळाव्यात ते सहभागी झाले. या मेळाव्याला ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे उपस्थित राहणार की नाही याची चर्चा रंगली होती. एकनाथ खडसे यांनी काही महिन्यांपूर्वी आपण भाजपामध्ये प्रवेश कऱणार असल्याचं सांगितलं होतं. पण अद्याप त्यांचा भाजपा प्रवेश झाला नाही. त्यातच त्यांना मोदींच्या कार्यक्रमाचं निमंत्रणही देण्यात आलं नाही. शासकीय कार्यक्रम असतानाही आमदार असणाऱ्या खडसेंना निमंत्रण नसल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. "शासकीय कार्यक्रम असल्यानं सर्व आमदारांना निमंत्रण देणं बंधनकारक होतं, पण मला या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं नाही. वेळेत निमंत्रण मिळालं असतं तरी मी कार्यक्रमाला गेलो असतो. आता निमंत्रण मिळालं तरी जाणार नाही," असं खडसे यांनी स्पष्ट केलं.

काय आहे 'लखपती दीदी योजना'? : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात या योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत देशभरातील 2 कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जातं. प्लंबिंग, एलईडी बल्ब बनवणं, ड्रोन चालवणे आणि दुरुस्ती करणे अशा अनेक कौशल्यांचे प्रशिक्षण महिलांना दिलं जातं. ही योजना प्रत्येक राज्यातील स्वयं-सहायता गटांमार्फत चालवली जाते. आता या योजनेच्या लाभार्थ्यांचं उद्दिष्ट हे 2 कोटींवरून 3 कोटी करण्यात आलंय.

लखपती दीदी योजनेसाठी पात्रता : या योजनेसाठी वयोमर्यादा नाही. सर्व भारतीय महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांच्या राज्यातील बचत गटांमध्ये सामील व्हावं लागेल.

अर्ज कसा करायचा? : या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला 'सेल्फ हेल्प ग्रुप' व्यवसाय योजना तयार करावी लागेल. व्यवसाय आराखडा तयार झाल्यानंतर बचत गट हा आराखडा आणि अर्ज सरकारकडं पाठवेल. यानंतर सरकार या अर्जाचे पुनरावलोकन करेल. अर्ज स्वीकारला गेला तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत अनेक राज्यांमध्ये 5 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्जही दिलं जातं.

हेही वाचा - "आयएएसचे खासगीकरण ही आरक्षण...", यूपीएससीमधील लॅटरल एन्ट्रीवरून राहुल गांधींचा मोदींवर निशाणा - upsc recruitment 2024

Last Updated : Aug 25, 2024, 2:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.