ETV Bharat / state

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भावनिक साद, म्हणाले 'उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत' - Pm Modi On Uddhav Thackeray - PM MODI ON UDDHAV THACKERAY

Pm Modi On Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक 2024 साठी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांची भावनिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

Pm Modi On Uddhav Thackeray
संपादित छायाचित्र (ETV Bharat Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 3, 2024, 2:00 PM IST

मुंबई Pm Modi On Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले असून तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे. देशभरात निवडणुकीचे एकूण सात टप्पे पार पडणार असून 4 जून या दिवशी निकाल लागणार आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचार शिगेला पोहोचला असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या जात आहेत. या प्रचारात अनेक ठिकाणी भावनिक मुद्दा हा सुद्धा प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला आहे. याच अनुषंगानं महाराष्ट्र राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या फोडाफोडीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना भावनिक मुद्द्याच्या आधारे जनतेची साथ मिळेल, अशी अपेक्षा असताना आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयाला बगल दिली. तर दुसरीकडं ठाकरे परिवारासाठी आपण अडचणीच्या काळात सर्वात अगोदर धावून जाणारी व्यक्ती असू, असा भावनिक मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

नेमकं काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ? : एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "राज्यात एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या बंडानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. साहेबांची ती आपुलकी, प्रेम हे मी कधीही विसरु शकत नाही. आजच्या घडीला महाराष्ट्रात आमचे सर्वाधिक आमदार असूनही आम्ही मुख्यमंत्रीपद शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना दिलं. माझ्याकडून हीच बाळासाहेब ठाकरेंना वाहिलेली ही एक आदरांजली आहे. उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. तसेच बाळासाहेब ठाकरेंवर माझी खूप श्रद्धा आहे, मी त्यांचा आजही आदर करतो आणि यापुढं आयुष्यभर करत राहीन," असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. "बाळासाहेब ठाकरेंचं माझ्यावर खूप ऋण आहेत, म्हणूनच उद्धव ठाकरेंनी माझ्यावर कितीही टीका केली तरीही त्यांना मी उत्तर देणार नाही," असंही मोदी म्हणाले आहेत. तसेच "महाराष्ट्रात औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्यांबरोबर केवळ सत्तेसाठी उद्धव ठाकरे जाऊन बसले, हे लोकांना मुळीच पटलेलं नाही. याकरता भावनिकदृष्ट्या जनता भाजपासोबत आहे. बाळासाहेब ठाकरेंनी इतक्या मेहनतीनं पक्ष उभा करत एक विचारधारा घेऊन महाराष्ट्र चालवला. ती विचारधारा सोडून उद्धव ठाकरे फक्त सत्तेसाठी काँग्रेस बरोबर गेले? हे जनतेला मुळीच पटलेलं नसून जनता यांना माफ करणार नाही," असंही मोदी म्हणाले आहेत.

मदतीसाठी धावून जाणारा मी पहिला व्यक्ती : "उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. जेव्हा ते आजारी होते, तेव्हा मी त्यांना फोन केला. तसेच रश्मी वहिनींना रोज फोन करुन मी उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस करायचो. ऑपरेशन करण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी मला फोन केला होता. आपका क्या विचार है? असं मला त्यांनी विचारलं होतं. तेव्हा मी त्यांना सांगितलं की अगोदर तुम्ही ऑपरेशन करा आणि शरीराकडं लक्ष द्या. बाकीची चिंता तुम्ही सोडून द्या. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी उद्धव ठाकरे यांचा मान सन्मान करणारंच. त्यांच्यावर जर उद्या कुठलं संकट आलं, तर त्यांच्या मदतीसाठी धावणारा मी पहिला व्यक्ती असेन," असंही मोदी म्हणाले. "परंतु बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले आहेत. ते बाळासाहेबांचे विचार आज एकनाथ शिंदे पुढं घेऊन जात आहेत," असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. "शरद पवारांना या वयामध्ये कुटुंब सांभाळता आलं नाही, ते महाराष्ट्र काय सांभाळणार?" असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

हेही वाचा :

  1. "विश्वासघात ही काँग्रेसची...", धाराशिवमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल - Lok Sabha Election 2024
  2. मावळत्या सूर्याच्या साक्षीनं खोटी शपथ घेणाऱ्यांना शिक्षा करण्याची वेळ, मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल - PM Modi Malshiras Sabha
  3. धर्मावर आधारित आरक्षणाचं विधान करून समाजातील तणाव वाढविण्याचा प्रयत्न-शरद पवारांची पंतप्रधानांवर टीका - Sharad Pawar

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.