ETV Bharat / state

मराठा आरक्षणाबाबत मंत्री धनंजय मुंडेंनी मांडली भूमिका - Dhananjay Munde

Dhananjay Munde: मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची मागणी आहे. (Maratha reservation) मी ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर 2002 मध्ये पहिला ठराव कुठला जर घेतला असेल तर मराठा आरक्षणाचा घेतला होता. (Jarange Patil) तेव्हापासून मराठा आरक्षणाच्या बाजूनं आम्ही आहोत, असं मत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मांडलं आहे.

Our role is to get reservation
मंत्री धनंजय मुंडे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 26, 2024, 8:25 PM IST

मंत्री धनंजय मुंडे मराठा आरक्षणावर बोलताना

बीड Dhananjay Munde : मराठा आरक्षणासाठी घेतलेला निर्णय हायकोर्टात टिकला. मात्र, सुप्रीम कोर्टात टिकला नाही. त्यामुळे कायमस्वरूपी पिढ्यांपिढ्या टिकणारं आरक्षण देण्यासाठी वेळ लागणार आहे, हे जरांगे पाटलांनासुद्धा माहीत आहे. (Maratha Agitation) या सर्व गोष्टी करत असताना कायद्याच्या चौकटीत बसवत असताना थोडा वेळ लागत आहे. त्यामुळे सरकार सर्व बाजूनं प्रयत्न करत आहे, असं मत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मांडलं.

ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी 22 वसतिगृह : बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या मुला-मुलींसाठी एकूण 22 वसतिगृह उभारण्यात आल्याची ग्वाही बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. त्याचबरोबर जे लोकं आपले मुलं ऊस तोडणीच्या फडात घेऊन जातात त्यांच्यासाठी हे वसतिगृह उभारण्यात आले आहेत.

दुष्काळ असला तरी कमतरता भासू देणार नाही : बीड जिल्ह्यात विविध विकासांची कामे हाती घेतली असून ही कामे लवकरात लवकर मार्गी लागणार आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात दुष्काळ असला तरी कुठलीही कमतरता भासू दिली जाणार नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या गेल्या आहेत. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमासारखी योजना शेतकऱ्यांनी आपल्या शेतात राबवावी आणि वाहून जाणारं पाणी देखील आपल्या शेतातच मुरवावं अशी विनंती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.

'तो' अध्यादेश निघेपर्यंत माघार नाही : मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मात्र, जोपर्यंत सग्यासोयऱ्यांच्या नोंदी ग्राह्य धरण्याचा अध्यादेश निघत नाही, तोपर्यंत आपण माघार घेणार नाही, असं स्पष्ट भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळं शनिवारी (27 जानेवारी) दुपारपर्यंतचा वेळ जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय. मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन आता ते मुंबईत दाखल झाले आहेत.

हेही वाचा:

  1. आजची रात्र इथंच, उद्या आझाद मैदानावर जाणार; मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा
  2. चार कोटीचे दागिने लूट प्रकरण, 3 माजी सैनिकांसह पाच जणांना अटक
  3. महाविकास आघाडीची बैठक; 'वंचित'चा संजय राऊतांवर हल्लाबोल, निमंत्रण नसल्याचं केलं स्पष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.