ETV Bharat / state

हॉटेल कर थकबाकी प्रकरण : निलेश राणेंकडून 25 लाखांचा धनादेश आणि थकबाकी झाली 'शून्य' - निलेश राणेंकडून 25 लाखांचा धनादेश

Nilesh Rane Hotel Seal Case : मागील तीन वर्षापासून मिळकत कर थकल्यानं पुणे महापालिकेनं निलेश राणे यांच्या हॉटेलला टाळं ठोकलं होतं. या प्रकरणी निलेश राणे यांनी 25 लाखांचा धनादेश देताच थकबाकी शून्य करण्यात आली आहे. त्यामुळं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Nilesh Rane Hotel Seal Case
माजी खासदार निलेश राणे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 29, 2024, 2:02 PM IST

पुणे Nilesh Rane Hotel Seal Case : माजी खासदार निलेश राणे यांच्या पुण्यातील शिवाजीनगर भागातील हॉटेलला मिळकतकर थकवल्यानं पुणे महापालिकेनं टाळं ठोकलं होतं. यानंतर बुधवारी निलेश राणे यांच्याकडून 25 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. याबाबत सुनावणी होऊन पुढील रक्कम भरण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात आलं, अशी माहिती महापालिकेचे मिळकत कर प्रमुख माधव जगताप यांनी दिली आहे. मात्र निलेश राणे यांनी 25 लाखांचा धनादेश देताच 3 कोटी 77 लाख 53 हजार रुपयाची थकबाकी शून्यावर आली आहे.

तीन वर्षांपासून थकलेली होती थकबाकी : निलेश राणे यांचं पुण्यातील डेक्कन परिसरात आर-डेक्कन मॉलमधील तिसऱ्या मजल्यावर हॉटेल आहे. या हॉटेलचे 3 कोटी 77 लाख 53 हजार 803 रुपये एवढी रक्कम मागील तीन वर्षांपासून थकलेली होती. महापालिकेच्या माध्यमातून वारंवार नोटीस देऊन ही रक्कम न भरल्यानं ती मिळकत सिल करण्यात आली होती.

निलेश राणेंकडून 25 लाखांचा धनादेश : निलेश राणे यांनी बुधवारी 25 लाखांचा धनादेश पुणे महानगरपालिकडं जमा केला आहे. यानंतर त्यांची थकबाकी शून्य करण्यात आली आहे. राजकीय दबावापोटी त्यांची थकबाकी शून्य करण्यात आल्याचा आरोप आता करण्यात येत आहे. पण याबाबत महापालिकेचे मिळकत कर प्रमुख माधव जगताप यांना विचारलं असता, ते म्हणाले की, आता त्यांनी 25 लाख रुपये दिले आहेत. याप्रकरणी सुनावणी होणार आहे. त्यानुसार पुढील रक्कम भरणार असल्याचं हमीपत्र त्यांच्याकडून देण्यात आलं आहे.

महापालिकेकडून धडक कारवाई : महापालिकेच्या कर आकारणी आणि करसंकलन विभागाकडून मिळकतकर थकबाकी वसुली केली जात आहे. शंभर टक्के कर वसुलीसाठी महापालिकेकडून धडक कारवाई केली जात आहे. निलेश राणे यांच्यावर मिळकतकराची 3 कोटी 77 लाख 53 हजार 803 रुपये एवढी रक्कम मागील तीन वर्षांपासून थकलेली होती. ती न दिल्यानं महापालिकेच्या वतीनं कारवाई करण्यात आली होती. 25 लाख रुपये दिल्यानं त्यांची थकबाकी शून्य करण्यात आली. त्यामुळं यामागं राजकीय दबाव असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा :

  1. निलेश राणे यांच्या हॉटेलला महापालिकेनं ठोकलं टाळं, तीन कोटी रुपयांहून अधिक रक्कम थकीत
  2. निलेश राणे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत? म्हणाले, सम्राट महाडिकांसोबत विधिमंडळात दिसणार म्हणजे दिसणारच!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.