छत्रपती संभाजीनगर Neelam Gorhe Statement : "आम्ही महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रा राज्यभरात काढणार आहोत. मुख्यमंत्री लाडकी बहीण सारख्या चांगल्या हेतूनं केलेल्या योजनांच्या मदतीनं महाराष्ट्रातील महिलांना दीड हजार रुपये प्रति महिन्याला मिळणार आहेत. त्यामुळे हा सन्मान आहे," असं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री स्त्री सन्मान यात्रेच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. तर मराठवाड्यातील टंचाई ग्रस्त परिस्थितीचा यावेळी त्यांनी आढावा घेतला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील महिलांच्या पाठीशी : "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील महिलांच्या पाठीशी नेहमी उभं आहेत. त्यांच्या सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. 15 ऑगस्ट आणि राखी पौर्णिमा काही दिवसांनी येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या माध्यमातून महायुती सरकारनं महिलांना नेहमीच केंद्रस्थान दिलं आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी मदत करण्यासाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये वृद्धापकाळ योजना, विद्यार्थ्यांसाठी स्टायपेंड योजना अशा विविध योजना आहेत. आम्हाला अधिक चांगल्या हेतूनं आणि प्रभावी योजना आमच्या लोकांपर्यंत आणायच्या आहेत," असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.
टंचाईग्रस्त स्थितीचा आढावा : राज्य शासनानं जाहीर केलेल्या टंचाई स्थितीतील सवलती आणि उपाययोजनांच्या अंमलबजावणीची सद्यस्थितीचा आढावा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह शासनाच्या महिला तसेच सर्वच घटकांसाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन पात्र लाभार्थ्यांना तत्परतेनं लाभ द्या, असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले. राज्य शासनानं जाहीर केलेल्या टंचाई स्थितीतील सवलती आणि उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनानं चांगलं काम केलं आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शासनानं शुल्कमाफीच्या जाहीर केलेल्या सवलतीची अंमलबजावणीदेखील चांगली झाली. याबाबतच्या प्रलंबित प्रस्तावाबाबत सबंधित विभागानं पाठपुरावा करावा, तसंच आपल्या स्तरावरूनही याबाबत सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं. "मराठवाडयातील टंचाई स्थितीतही पुरेसा चारा उपलब्ध राहीला, याबाबत पशुसंवर्धन आणि कृषी विभागाचं कौतुक त्यांनी केलं. मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यात या दोन्ही विभागांच्या चारा नियोजनामुळे हे शक्य झालं आहे. राज्यातील इतर जिल्हयासांठी चारा लागवडीचा हा पॅटर्न मार्गदर्शक ठरणारा आहे. तसेच सप्टेंबरअखेरपर्यंत ज्या गावांना टँकरनं पाणी पुरवठ्याची गरज भासेल, अशा गावांच्या कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव शासनाकडं पाठवा," असे निर्देशही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.
हेही वाचा :
- लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान सोनिया गांधी यांनी आचारसंहितेचा भंग केला; नीलम गोऱ्हे यांचा गंभीर आरोप - Lok Sabha Election 2024
- संजय राऊत प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा स्वप्ना पाटकर यांना धमकीचा फोन - डॉ. नीलम गोऱ्हे - Neelam Gorhe PC Mumbai
- "मतदान करणार पण महिलांना हवीय समस्यांची सोडवणूक"; नीलम गोऱ्हे Exclusive ऑन 'ईटीव्ही भारत' - Lok Sabha Election 2024