ETV Bharat / state

मुख्यमंत्री नितीश कुमारांवर खासदार सुप्रिया सुळेंची जोरदार टीका; काढली अमित शाहांची आठवण - खासदार सुप्रिया सुळे

Supriya Sule On Nitish Kumar : मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत भाजपासोबत सत्ता स्थापन केलीय. त्यामुळं इंडिया आघाडीच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपासह नितीश कुमारांवर निशाणा साधला आहे.

MP Supriya Sule On Nitish Kumar
MP Supriya Sule On Nitish Kumar
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2024, 10:37 PM IST

सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

पुणे Supriya Sule On Nitish Kumar : बिहारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून, महागठबंधनचं सरकार कोसळलं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत एनडीएसोबत सरकार स्थापन केलंय. यावेळी त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्र्यांनी देखील शपथ घेतली आहे. नितीश कुमार यांनी ‘इंडिया’ आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, त्यांनी भाजपाचं कमळ हातात घेत 'इंडिया' आघाडीला मोठा धक्का दिला आहे.

सुप्रिया सुळेंची टीका : नितीश कुमार यांनी रविवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 'इंडिया' आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावणारे नितीशकुमार भाजपासोबत गेल्यानं इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. तसंच केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? : 'इंडिया' आघाडीत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काम करत आहे. ही आमची वैचारिक लढाई आहे. दिल्लीत दडपशाही सुरू आहे. सत्ताधारी व्यवस्थेचा गैरवापर करून विरोधकांचे सरकार पाडत आहेत. त्यामुळं आम्ही या घटनेचा निषेध करतो. पण आमचा या दडपशाहीविरुद्ध लढा सुरूच राहील, असं सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. नितीश कुमारांनी भाजपा सोडल्यानंतर भाजपाचे दार त्यांच्यासाठी कायमचे बंद झाले, असं गृहमंत्री अमित शाहा म्हणाले होते. मात्र, भाजपानं आता राजकारणातील नैतिकता गमावली आहे. महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत हेच वाक्य मी ऐकलंय. त्यामुळं हा भाजपाचा स्वभाव असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

बिहारमध्ये झुंज देणार : नितीश कुमार यांच्या जाण्यानं आम्हाला काही फरक पडणार नाही. यापुढं इडिया आघाडी अधिक जोमानं लढणार आहे. बिहारमध्ये काँग्रेस, तेजस्वी यादव कडवी झुंज देतील, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केलाय.

इंडिया आघाडीच्या भवितव्याबाबत चिंता : नितीश कुमार यांनीच इंडिया आघाडीचा पाया रचला होता. इंडिया आघाडीची पहिली बैठक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये झाली. तसेच, इंडिया आघाडीकडून नितीश कुमार यांचा पंतप्रधानपदासाठी विचार केला जात होता. मात्र, लोकसभा निवडणुकीदरम्यान नितीश कुमार यांनी आपली भूमिका बदलत भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळं इंडिया आघाडीला मोठा फटका बसला आहे. ममता बॅनर्जी, 'आप'नं देखील स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर नितीश कुमार यांनीही इंडिया आघाडीतून बाहेर पडत भाजपासोबत सत्ता स्थापन केलीय. त्यामुळं इंडिया आघाडीच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

हे वाचलंत का :

  1. नितीश कुमारांनी नवव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, राजभवनात 'जय श्री राम'च्या घोषणा
  2. 'बिहारचे योगी' बनले नितीश सरकारमध्ये उपमुख्यमंत्री, जाणून घ्या कोण आहेत सम्राट चौधरी?
  3. नितीश कुमार यांच्यासोबत 'या' आठ नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ; जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.