ETV Bharat / state

नाशिक : नवसाला पावणाऱ्या दाजीबा वीरांची मिरवणूक; पारंपरिक वेशभूषांनी चिमुकल्यांनी वेधलं लक्ष - Dajiba Vira Procession

Dajiba Vira Procession : होळीच्या दुसऱ्या दिवशी देशभर धुळवड साजरी केली जाते, मात्र नाशिकमध्ये धुळवडीच्या दिवशी पारंपरिक पद्धतीनं दाजीबा वीरांची मिरवणूक काढली जाते. दाजीबा वीर नवसाला पावतात अशी समजूत असून ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.

Nashik News traditional procession of Dajiba Veer on Dhulivandan day in Nashik
दाजीबा वीरांची मिरवणूक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 25, 2024, 10:06 PM IST

वीर दाजीबा बाशिंग मिरवणुकीनं गोदाकाठ दुमदुमला

नाशिक Dajiba Vira Procession : धार्मिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवडीला एक अनोखी परंपरा आहे. जुने नाशिक परिसरातून वीर दाजीबा बाशिंग मिरवणूक काढली जाते. जवळपास 300 वर्षांपासून ही परंपरा सुरु असून, दाजीबा वीर नवसाला पावणारा देव असून तो सर्वांचं विघ्न दूर हरतो, अशी भावना नाशिककरांमध्ये आहे. याच पार्श्वभूमीवर आज (25 मार्च) नाशिकच्या जुन्या शहरातून हलगीच्या तालावर दाजीबा वीरांची मिरवणूक काढण्यात आली आहे.

नवसाला पावणार दाजीबा वीर : खास करून अविवाहित मुलं-मूली या दाजीबा वीराला बाशिंग वाहून दर्शन घेतात. या वीराला बाशिंग वाहिल्यानंतर अविवाहित मुला-मुलींची लग्न जमतात अशी या वीरांची आख्यायिका आहे. त्यामुळं या वीराला बाशिंगी वीर देखील म्हटलं जातं. शहरात ठिकठिकाणी महिला या वीरांचं मनोभावे औक्षण करतात. दुपारी 4 वाजाता निघालेली ही दाजीबा वीरांची मिरवणूक सकाळ पर्यंत सुरु असते. तर मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दाजीबा वीराची आख्यायिका : दाजीबा बाशिंग वीर या पारंपरिक मिरवणुकीमागे एक आख्यायिका सुद्धा आहे. हळद लागलेल्या नवरदेवाची लग्नाची इच्छा अपूर्ण राहिली, त्यामुळं अंगाला हळद लावून डोक्यावर देवाचा मुकुट घेत बाशिंग बांधून आपल्या होणाऱ्या पत्नीच्या शोधात नवरदेव फिरतो, अशी या वीराची आख्यायिका सांगितली जाते. तर हे दाजीबा नवसाला पावणारे असून आज त्यांचं दर्शन घेतल्यानं सर्व दुःख दूर होऊन मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. जवळपास 300 वर्षांपासूनची ही परंपरा असून जुन्या नाशकातील बेलगावकर यांच्याकडं 40 वर्षांपासून हा मान देण्यात आला आहे.

चिमुकल्यांच्या वेशभूषांनी वेढून घेतलं लक्ष : होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवडला नाशिकच्या गोदा काठावर यात्रा भरते. ढोल-ताशांचा आवाज आणि होळी भोवती ठेक्यावर नाचणारे वीर, देवीदेवतांचे रंगवलेले मुखवटे आणि चिमुरड्यांनी केलेल्या शंकर, हनुमान, खंडेराव महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, रावण अशा विविध देवदेवता, महापुरुषांच्या वेशभूषा करून या उत्सवात सहभागी झाले होते. तसंच पूर्वजांच्या टाकांना पवित्र गोदावरी स्नान घालण्यात आलं,या वीरांना बघण्यासाठी नाशिककरांनी गोदाघाट परिसरात मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा -

  1. होळीनिमित्त हास्य कवी डॉ. विष्णू सुरासे यांची खास कविता; पाहा व्हिडिओ - Holi 2024
  2. राजकीय नेत्यांची धुळवड! मुख्यमंत्री शिंदे नातवासोबत रंगले धुळवडीच्या रंगात, तर जितेंद्र आव्हाडांनी पारंपरिक पद्धतीनं केली होळी साजरी - Holi 2024
  3. कोकणची अनोखी होळी; आमदार भास्कर जाधवांनी लुटला पालखी नाचवण्याचा आनंद - Holi Festival 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.