ETV Bharat / state

आज 'ब्लॉकवार'; मध्य रेल्वेचा मेगा तर पश्चिम रेल्वेचा जम्बोब्लॉक; संपूर्ण वेळापत्रक वाचा फक्त एका क्लिकवर - Mumbai Local Train Mega Block - MUMBAI LOCAL TRAIN MEGA BLOCK

Mumbai Local Train Mega Block : मुंबईत आज मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लोक घेण्यात आलाय. त्यामुळं अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळं मुंबईकरांना रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक वाचूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात येतंय.

Mumbai local train Mega Block
मुंबई लोकल ट्रेन संग्रहित छायाचित्र (Source : ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 25, 2024, 6:45 AM IST

मुंबई Mumbai Local Train Mega Block : मुंबईकर रविवारी सुट्टी असल्यानं घराबाहेर पडण्याचा विचार करतात. मात्र, रविवारी मध्य रेल्वे, हार्बर मार्गावर व पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर ब्लॉक घेण्यात आलाय. त्यामुळं याची माहिती घेऊन मुंबईकरांनी लोकल प्रवासाचे नियोजन करण्याची गरज आहे.

मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी ब्लॉक घेण्यात आलाय. मध्य रेल्वेच्या उपनगरीय विभागावर मेगाब्लॉक घेण्यात आलाय तर पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात आलाय.

मध्य रेल्वे मार्गावर कधी व कुठे मेगाब्लॉक असेल? : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी २.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा या कालावधीत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात आल्यात व त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबा घेऊन या गाड्या त्यांच्या गंतव्य स्थानावर १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. तर, ठाण्यापुढे जाणाऱ्या सर्व जलद गाड्या मुलुंडपासून डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्यात.

ठाणे रेल्वे स्थानकातून सकाळी १०.५० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड रेल्वे स्थानकापासून अप धीम्या मार्गावर वळवल्या आहेत. या गाड्या मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यावर थांबून पुढे माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवल्या आहेत. तसेच त्यांच्या गंतव्यस्थानावर १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल? : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी डाऊन जलद मार्गावर १०.२० वाजता बदलापूर लोकल सुटेल, ब्लॉकपूर्वीची ती शेवटची लोकल असेल. तर दुपारी ३.०३ वाजता सुटणारी बदलापूर लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ब्लॉकनंतरची पहिली लोकल असेल.

अप जलद मार्गावर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी ११.१० वाजता पोचणारी अंबरनाथ लोकल ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल असेल. तर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुपारी ०३.४९ वाजता पोचणारी कसारा लोकल ही ब्लॉकनंतरची पहिली लोकल असेल.

सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत अप आणि डाऊन हार्बर मार्गावर पनवेल- वाशी दरम्यान (नेरुळ/बेलापूर-उरण पोर्ट मार्ग वगळून) मेगाब्लॉक घेण्यात येईल.

पनवेल येथील सेवा बंद : पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा पूर्णत: बंद राहील.

सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत पनवेल ते ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत ठाणे येथे जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा पूर्णत: बंद राहतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३० वाजता सुटणारी व १०.५० वाजता पनवेल येथे पोहचणारी डाऊन हार्बर मार्गावरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल असेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल दुपारी ३.१६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि पनवेल येथे सायंकाळी ४.३६ वाजता पोहचेल.

अप हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी शेवटची लोकल सकाळी १०.१७ वाजता पनवेल येथून सुटेल आणि ११.३६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहचेल आणि ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पनवेल येथून सुटणारी पहिली लोकल दुपारी ४.१० वाजता असेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे सायंकाळी ५.३० वाजता पोहचेल.

डाउन ट्रान्स हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी पनवेलच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल ठाणे येथून सकाळी ९.३९ वाजता सुटेल आणि पनवेल येथे सकाळी १०.३१ वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर पनवेलच्या दिशेने जाणारी पहिली लोकल ठाणे येथून दुपारी ४.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे सायंकाळी ४.५२ वाजता पोहचेल.

अप ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे येथे जाणारी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०.४१ वाजता सुटेल व ठाणे येथे सकाळी ११.३३ वाजता पोहचेल. ही ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल असेल तर, ब्लॉकनंतर ठाण्याच्या दिशेने जाणारी पहिली लोकल पनवेल येथून सायंकाळी ४.२६ वाजता सुटेल आणि सायंकाळी ५.२० वाजता ठाणे येथे पोहचेल.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी सेक्शनमध्ये विशेष लोकलच्या फेऱ्या चालवल्या जातील. तर, ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. तसेच, बेलापूर/नेरुळ आणि उरणस्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असतील.

पश्चिम रेल्वेचा जम्बोब्लॉक : पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर 5 तासांचा जम्बोब्लॉक घेण्यात आलाय. सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत हा जम्बोब्लॉक घेण्यात आलाय.

या कालावधीत बोरीवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सर्व अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या अप आणि डाऊन जलद मार्गावर चालवल्या जातील. तसेच, अप आणि डाऊन मार्गावरील काही उपनगरीय सेवा रद्द केल्या.

अंधेरी आणि बोरीवली गाड्या हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार आहेत.

कालावधीत बोरीवली स्थानकावरील फलाट क्रमांक 1,2,3 आणि 4 वरून कोणत्याही गाड्या चालवल्या जाणार नाहीत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.