ETV Bharat / state

मरीन ड्राइव्ह ते हाजी अली फक्त 9 मिनिटांत! कोस्टल रोडचा दुसरा बोगदा प्रवाशांसाठी खुला, 'या' दोन दिवशी राहणार बंद - Mumbai Coastal Road - MUMBAI COASTAL ROAD

Mumbai Coastal Road phase 2 : मुंबई कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून (10 जून) प्रवासासाठी खुला केला. मरीन ड्राइव्ह ते हाजी अलीपर्यंतचं अंतर आता केवळ 9 मिनिटांत पार करणं शक्य होणार आहे. राहिलेल्या कामासाठी हा रोड आठवड्यातील दोन दिवस बंद राहणार आहे.

Coastal Road Second Tunnel opened from today 10th june marine drive to worli can now be reached in just 9 minutes
कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून खुला (Source ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 10, 2024, 10:53 AM IST

Updated : Jun 10, 2024, 4:17 PM IST

मुंबई Mumbai Coastal Road phase 2 : मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील दक्षिण मुंबईला उत्तर मुंबईशी जोडणारा मरीन ड्राइव्ह ते हाजी अली दरम्यानचा दुसरा बोगदा आजपासून (10 जून) वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाहणीनंतर हा मार्ग खुला करण्यात आला.

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहणी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोस्टल रोडची पाहणी केली. सव्वा सहा किलो मीटरचा मुंबई ते हाजी अली अशा दुसऱ्या टप्प्यातील कोस्टल रोडचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. कोस्टल रोडचा दुसरा बोगदा खुला करण्यात आला आहे. उर्वरित कामामुळं शनिवार आणि रविवार हा मार्ग बंद राहणार असून, या रोडमुळं मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांना विश्वास : मरीन ड्राईव्ह ते हाजी अली 9 मिनिटात गाठता येणार : मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी व्हिंटेज कारमधून कोस्टल रोडची पाहणी केली. तसेच कोस्टल रोडचे तिसऱ्या टप्प्यातील उद्घाटन जुलैमध्ये होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोस्टल रोडचं अनेकांनी कौतुक केलं. 'बिग बी' अमिताभ बच्चन यांनीही कौतुक केलं. असा हा प्रकल्प मुंबईकरांना दिलासा देणारा आहे. तसेच मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि जलदगतीने होईल आणि मरीन ड्राईव्ह ते हाजी अली अवघ्या 9 मिनिटात गाठता येणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

90 टक्के काम पूर्ण : महानगरपालिकेच्या वतीनं बांधण्यात येत असलेला महत्त्वाकांक्षी असा छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड दक्षिण प्रकल्प 90 टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाला असल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिलीय. मंगळवारी (11 जून) सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत म्हणजे 16 तासांच्या कालावधीसाठी हा मार्ग वाहतुकीला नियमितपणे खुला करण्यात येणार आहे. दर आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस या मार्गावर वाहतूक सुरू राहील. तर शनिवार आणि रविवार असे आठवड्यातील दोन दिवस प्रकल्पाची उर्वरित कामं पूर्णत्वास नेणे सोयीचे व्हावे, यासाठी हा मार्ग बंद राहील, असं पालिका प्रशासनानं म्हटलंय.

मुंबईकरांचा प्रवास सुखकर : छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड दक्षिण प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आहे. असे असले तरी प्रकल्पातील हा हिस्सा वाहतुकीसाठी वापरात आणणं शक्य आहे. त्यातून वाहतुकीचा भार कमी व्हावा. मुंबईकरांचा प्रवास जलद आणि अधिक सुखकर व्हावा, या हेतूनं टप्प्याटप्प्यानं मार्ग खुले करण्यात येत असल्याचं प्रशासनानं म्हटलंय.

सुलभ वाहतूक : मरीन ड्राइव्ह परिसर ते हाजी अली परिसर असा उत्तर दिशेने प्रवासासाठी सुमारे 6.25 किलोमीटर लांबीचा मार्ग खुला झाला आहे. या मार्गामध्ये अमरसन्स उद्यान आणि हाजी अली येथील आंतरमार्गिकांचा वापर करता येणार आहे. या आंतरमार्गिकांमुळं वेगवेगळ्या भागांमध्ये जाणारी वाहतूक सुलभ होईल. प्रामुख्यानं बॅरिस्टर रजनी पटेल चौकातून (लोटस जेट्टी) पुढं वरळी, वांद्रेच्या दिशेने तर वत्सलाबाई देसाई चौकातून (हाजी अली) पुढं ताडदेव, महालक्ष्मी, पेडर रोडकडे जाणारी वाहतूक सुलभ होणार आहे.

हेही वाचा -

  1. १४ हजार कोटींच्या कोस्टल रोडला पावसाळ्यापूर्वीच गळती, सुरक्षेच्या प्रश्नावर पालिका प्रशासनानं काय म्हटलंय? - Mumbai Coastal Road
  2. कोस्टल रोडवरून जाताना वेगावर ठेवा नियंत्रण, पहिल्या अपघातात सुदैवानं वाचला चालक - coastal road first accident
  3. मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला कोस्टल रोड पाणी गळतीचा आढावा - Coastal Road Water Leakage

Last Updated : Jun 10, 2024, 4:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.