ETV Bharat / state

Bala Nandgaonkar : राज ठाकरे-अमित शाह यांच्यात काय झाली चर्चा? बाळा नांदगावकरांनी केला खुलासा - LokSabha Election

Bala Nandgaonkar : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या दोघांमध्ये लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिलीय.

Raj Thackeray met Amit Shah
Raj Thackeray met Amit Shah
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 19, 2024, 10:33 PM IST

Updated : Mar 19, 2024, 10:55 PM IST

मुंबई Bala Nandgaonkar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणं निर्माण होत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सामील होण्याच्या शक्यतेवर चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीतील बैठक संपवून राज ठाकरे मुंबईत येताच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी महायुतीतील संभाव्य प्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांसमोर भाष्य केलं आहे.

निवडणुकीबाबत सकारात्मक चर्चा : "मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच अमित ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत लोकसभा निवडणुकीबाबत सकारात्मक चर्चा झाली. येत्या दोन दिवसांत युतीबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो," अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. मनसेला महायुतीकडून मिळणाऱ्या एका जागेवर बाळा नांदगावकर उमेदवार असण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरू आहे. याबाबतही नांदगावकर यांनी खुलासा केला आहे.

गडचिरोलीतूनही निवडणूक लढवू शकतो : आपल्या उमेदवारीबाबत बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, "मी यापूर्वी दोनवेळा दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. आता राज ठाकरेंनी सांगितल्यास मी गडचिरोलीतूनही निवडणूक लढवू शकतो. त्यामुळं काहीही झालं, तरी चालेल. राज ठाकरे आदेश देतील, त्यानुसार निर्णय घेऊ, बुधवारी पुन्हा राज ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करेन."

मनसेला कोणत्या जागा मिळणार?: महायुतीत राज ठाकरेंच्या मनसेला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई मतदारसंघ मनसेला मिळण्याची शक्यता आहे. मनसेचीही येथे ताकद आहे. अरविंद सावंत हे सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षााचे विद्यमान खासदार आहेत. ते महायुतीचे मागील दोन टर्ममध्ये उमेदवार होते. मात्र यावेळी ठाकरे यांनी भाजपाशी फारकत घेतल्यानं या भागात महायुतीचा उमेदवार कोण असेल, अशी चर्चा रंगली होती. त्यातच आता या जागेवर मनसेचा उमेदवार महायुतीच्या माध्यमातून उतरवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

मनसेला दोन जागा? : दुसरी जागा मनसेला ग्रामीण भागात मिळू शकते. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघात मनसेला ताकद देण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांना शिर्डीतून रिंगणात उतरविण्याच्या विचारात महायुती आहे. उच्चशिक्षित आणि तरुण चेहरा असलेल्या अमित ठाकरे यांना दक्षिण मुंबईत उभं करावे, अशी मागणी भाजपानं केली. त्यामुळं या मतदारसंघात ठाकरे कुटुंबातील आणखी एक व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे वाचलंत का :

  1. Uddhav Thackeray : "...आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न"; मनसे-भाजपा युतीवरुन उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
  2. Arvind Sawant : ईडीच्या चौकशीनंतर राज ठाकरे यांची भाषा आणि भूमिका बदलली - अरविंद सावंत
  3. MNS BJP Alliance : मनसेच्या इंजिनला कमळाचं इंधन, भाजपासोबत युती झाल्यास मनसेचा फायदा काय? जाणून घ्या समीकरण

Last Updated : Mar 19, 2024, 10:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.