ETV Bharat / state

'एमएमआरडीए'च्या इमारतीत भोंगे लावून नमाज, मनसे आक्रमक होताच पोलिसांना आली जाग - Namaz

ठाणे महानगरपालिका हद्दीतील 'एमएमआरडीए'ने उभारलेल्या इमारतीमध्ये स्पीकर लावून नमाज पढला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा आक्रमक झाली आहे. भोंग्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असतानाही असे प्रकार घडत असतील तर आम्ही मनसे स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.

MNS  aggressive over the fact that prayers
''एमएमआरडीए''च्या इमारतीत भोंगे लावून नमाज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2024, 2:44 PM IST

ठाणे : येथे एमएमआरडीएच्या काही इमारती आहेत. येथील घोडबंदर रोडवरील चितळसर मानपाडा परिसरात विस्थापितांना आसरा मिळावा यासाठी एमएमआरडीएने इमारती उभारलेल्या आहेत. दरम्यान येथे स्पीकर लावून नमाज पढला जात असल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या घटनेनंतर ठाण्यात नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर मनसेकडून त्या ठिकाणी अचानक पाहणी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी स्पीकर आणि इतर साहित्य ताब्यात घेतलं.

इमारतीतून अजानचा आवाज आला : ठाणे महानगरपालिका हद्दीतील विस्थापित प्रकल्पबाधित कुटुंबांना घोडबंदर येथील एमएमआरडीएच्या इमारतीत घरं दिली जातात. सध्या येथे काही इमारती रिकाम्या आहेत. यातील एका इमारतीतून अजानचा आवाज आल्याने अनेकांना त्याचं आश्चर्य वाटलं. तसंच, एका दिवसात तब्बल तीन वेळा स्पीकरवरून ही अजान दिली जात होती. या ठिकाणी अनेकांचं येणंजाणं असल्याचं निदर्शनास येताच काही स्थानिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडे तक्रार केली होती.

स्पीकरसह संबंधित सामान ताब्यात घेतले : स्थानिक पोलिसांना सोबत घेत अविनाश जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सदर ठिकाणी धाड टाकली. त्यामध्ये पोलिसांनी चौकशी केली असता तिथं स्पीकर असल्याचं आढळलं. त्यानंतर येथील स्पीकरसह संबंधीत सामान ताब्यात घेतल. मुंब्रा परिसरातून आलेल्या काही विस्थापित कुटुंबांनी हा प्रकार सुरू केल्याची बाब पोलीस तपासात समोर आली. मशिदींवर लावलेल्या भोंग्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असतानाही असे प्रकार घडतात, त्यामुळे पोलिसांनी या विरोधात कडक कारवाई करावी अन्यथा पुढच्या वेळी मनसेस्टाइलने दणका देऊ, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांना होतो त्रास : या परिसरामध्ये अनेक विद्यार्थी आहेत. ते शिक्षणासाठी, क्लासेससाठी जातात. त्यानंतर त्याना अभ्यास शांततेत करता यावा म्हणून शांततेची आवश्यकता असते. मात्र, अशा प्रकारामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक विद्यार्थ्यांनी एकत्र येत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे मदतीची मागणी केली होती.

हेही वाचा :

1 'नाद केला पण वाया नाय गेला'; मनोज जरांगे पाटलांची थेट अमेरिकेत हवा, 'टाइम्स स्क्वेअर'वर झळकले फोटो

2 कितीही धमक्या आल्या, तरी मी भूमिका बदलणार नाही; छगन भुजबळांचा हल्लाबोल

3 नाशिकमधील गुंडाबरोबरचा मुख्यमंत्र्यांचा फोटो आला समोर; संजय राऊतांनी पोस्ट करत केली 'ही' मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.