ETV Bharat / state

भंडारदराची शान अम्ब्रेला फॉल! पाहा धबधब्याचे मन मोहून टाकणारे दृश्य - Umbrella Falls

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2024, 12:54 PM IST

Updated : Aug 28, 2024, 1:47 PM IST

अहमदनगर : जिल्ह्यातील भंडारदरा धरण अर्थात विल्सन डॅमचं नाव घेतलं की पर्यटकांच्या नजरेसमोर येतो तो भंडारदरा धरणाच्या भिंतीजवळ असलेला एका मोठा गोलाकार धबधबा. त्याच्या छत्रीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे त्याला अम्ब्रेला फॉल म्हणून ओळखलं जातं. तोच अम्ब्रेला फॉल आता बरसायला लागला आहे. चला तर पाहुयात या 'अम्ब्रेला फॉल'ची मन मोहून टाकणारी दृश्यं.

Umbrella Falls
Umbrella Falls (ETV Bharat Reporter)

अहमदनगर : प्रवरा नदीवर आणि जमीन सपाटीपासून 150 मीटर उंचीवर इंग्रजांनी विल्सन अर्थात भंडारदरा धरणाची 1926 साली निर्मिती अकोले तालुक्यातील भंडारदरा आणि शेंडी गावाच्यामध्ये केली. भंडारदरा परिसरात अनेक नयनरम्य स्थळे आहेत. हे एक निसर्गसौंदर्यानं नटलेलं स्थान असून अनेक धबधबे डोंगर-कडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे येथील मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात.

अम्ब्रेला फॉल (ETV Bharat Reporter)
भंडारदरा धरण आणि त्या धरणातून पाणी सोडले असता गोलाकार खडकामुळे छत्रीसारखा आकार घेऊन पांढरा शुभ्र कोसळणारा अम्ब्रेला फॉल पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. सध्या हरिश्चंद्रगड आणि कळसुबाईच्या डोंगर परिसरात पाऊस कोसळायला लागला की भंडारदरा धरणात पाण्याची आवक सुरू होते. त्यानंतर धरण भरले की अम्ब्रेला फॉलमधून पाणी सोडण्यात येते. सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने धरणातून पाणी सोडताना ते अम्ब्रेलाफॉल मधूनही सोडण्यात आल्याने काही दिवस या मनमोहून टाकणाऱ्या धबधब्याचा आनंद पर्यटकांना घेता येईल. पाऊस कमी झाल्यास हा फॉल बंद करण्यात येतो.भंडारदरा धरणापासून महत्त्वाच्या शहरांचे नाशिक 68 किमी, कल्याण 133 किमी, मुंबई 162 किमी, इगतपुरी 46 किमी, पुणे 166 किमी आहे.भंडारदरा हे एक अतिशय वेगाने लोकप्रिय होत असलेलं पर्यटनस्थळ असून दरवर्षी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. बॉलीवूडमधील अनेक दिग्दर्शकांचं हे एक आवडतं स्थान असून कटी पतंग, हिना, राम तेरी गंगा मैली, राजू चाचा, देऊळ अशा अनेक प्रसिद्ध हिंदी मराठी चित्रपटांचं चित्रीकरण याच परिसरात झालेलं आहे.

इंग्रजांनी सन 1910 साली या धरणाचं बांधकाम सुरू केलं होतं. साधारणतः 10 वर्षांचा कालावधी नंतर 1926 साली काम पूर्ण झालं. धरण परिसरात सरासरी वार्षिक 3220 मिलिमीटर पाऊस पडतो. धरणाची उंची 507 मीटर असून रुंदी तळाशी 82.29 असून ओलिताखालील क्षेत्रफळ 57000 हेक्टर आहे. जलाशयाचं 15.54 किलोमीटर क्षेत्रफळ आहे. धरणाची 11 टीएमसी क्षमता आहे.

महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखर आणि वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना असणारे फोफसंडी ही ठिकाण आहे. तसंच रतनगड, मदनगड, कुलंग, आजोबागड, बितनगड, पाबरगड, विश्राम गड ( पट्टाकील्ला) हरिश्चंद्रगड यासारखे किल्ले आणि पर्यटन स्थळे अकोले तालुक्यात आहेत.

Last Updated : Aug 28, 2024, 1:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.