ETV Bharat / state

अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतामधील सॅन होजे येथे मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन - Marathi Film Festival At USA - MARATHI FILM FESTIVAL AT USA

Marathi Film Festival At USA : अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतामधील सॅन होजे येथे मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलय. येत्या २७ आणि २८ जुलैला हा मराठी चित्रपट महोत्सव होईल. या कार्यक्रमाला मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत.

Marathi Film Festival At USA
मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 22, 2024, 4:36 PM IST

मुंबई Marathi Film Festival In USA : मराठी चित्रपटाचे विषय वैविध्यामुळे चर्चेत असतात. मराठीमध्ये संहितेत अनेक प्रयोग होताना दिसतात. त्यामुळे अनेक मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये उत्तम कामगिरी करताना दिसतात. बऱ्याच मराठी चित्रपटांना अवॉर्ड्ससुद्धा मिळतात. खरंतर इंटरनॅशनल चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट पोहोचणं ही गोष्ट निर्माता-दिग्दर्शकासाठी अभिमानास्पद गोष्ट असते. आता उत्कृष्ट मराठी चित्रपटांचा खजिना एकत्रितपणे विदेशी रसिकांना पाहता येणार आहे. निमित्त आहे अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतामध्ये होऊ घातलेला मराठी चित्रपट महोत्सव. नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनच्यावतीने या चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलय. त्यामुळे आता केवळ मराठी चित्रपटच नाही तर मराठी चित्रपट महोत्सवही साता समुद्रापार पोहोचला आहे.

3 शॉर्टफिल्मचे प्रीमिअर होणार : अमेरिकास्थित मराठी निर्माते अभिजीत घोलप यांनी सुरू केलेल्या NAFA (North American Film Association) मार्फत हा भव्य सोहळा दिमाखात पार पडणार असून NAFA निर्मित ३ शॉर्टफिल्म्सचे ("निर्माल्य", "अथांग" आणि "पायरव") या महोत्सवात प्रीमिअर होणार आहेत. या शॉर्टफिल्मची निर्मिती, चित्रीकरण अमेरिकेतच झालेलं असून कलाकारही स्थानिकच आहेत. अशा प्रकारचा फिल्म उत्सव अमेरिकेत होणारा पहिलाच प्रयत्न असून यापुढेही अशा फिल्म फेस्टिवल्सचे आयोजन सुरूच राहणार आहे. या चित्रपट महोत्सवाला अनेक प्रथितयश आणि दिग्गज कलाकार हजेरी लावणार असून, महोत्सवादरम्यान इतर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कलाकारांची असणार उपस्थिती : ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, अभिनेते व दिग्दर्शक सचिन पिळगावकर, ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ, मृणाल कुलकर्णी, सुप्रिया पिळगावकर, अमेरिका स्थित मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी गाजविलेली अभिनेत्री अश्विनी भावे, निर्माते-अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर, गीतकार गुरू ठाकूर, अभिनेता सुबोध भावे, अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक, संगीतकार-दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आदी मातब्बर कलाकार मंडळी या चित्रपट महोत्सवाचा भाग होणार आहेत.

'या' कार्यक्रमांचे केले जाणार आयोजन : या चित्रपट महोत्सवाचे आयोजन कॅलिफोर्नियातील सॅन होजे (San Jose) येथे केले जात असून यात ५ नव्या मराठी चित्रपटांचे प्रीमियर होणार आहेत. तसंच स्क्रिनिंग्स व्यतिरिक्त ६ मास्टरक्लास, ३ पॅनल डिस्कशन, ९ शॉर्ट फिल्म्सचे शो असे निरनिराळे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. मराठी चित्रपट प्रेमींनी या महोत्सवाचा आनंद लुटावा, असं आयोजन आयोजकांकडून करण्यात आलं आहे.

हेही वाचा :

  1. मनीषा कोईरालानं ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची घेतली भेट, फोटो केले शेअर - Manisha Koirala meets UK PM
  2. कर्नाटकातून शिर्डीला जाणाऱ्या खासगी बसची बिअरच्या कंटेनरला धडक, 18 जण जखमी, 4 गंभीर - chhatrapati sambhaji nagar accident
  3. अपघात प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांचे आहे अंडरवर्ल्ड कनेक्शन, पोलिसांनी वरदहस्त दाखविल्यानं टळली अटक - pune hit and run accident

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.