ETV Bharat / state

जरांगे पाटलांच्या 'मातोरी' गावात दगडफेक:डीजेवरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती; दुचाकी फोडल्या...! - Manoj Jarange Matori Village - MANOJ JARANGE MATORI VILLAGE

Manoj Jarange Matori Village मनोज जरांगे पाटील यांच्या मातोरी गावामध्ये दोन गटात वाद झाल्यानं दगडफेकीची घटना घडली. यात गावातील अनेक दुचाक्या फोडण्यात आल्या असून आता परिस्थिती शांततेत आहे.

Manoj Jarange Matori Village
जरांगे पाटलांच्या 'मातोरी' गावात वाद झाल्याने फोडलेल्या दुचाकी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 28, 2024, 2:50 PM IST

बीड Manoj Jarange Matori Village : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या मातोरी गावात दोन गटात वाद झाल्यानं दगडफेकीची घटना घडली. डीजेवरून मराठा आणि ओबीसी यांच्यात तुफान राडा झाला. त्यात गावातील अनेक दुचाकी फोडल्याचं समोर आलं असून एका डीजेचं मोठं नुकसान झालेलं आहे. या घटनेमुळं गावात तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. परंतु आता शांतता आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हा वाद मनोज जरांगे यांच्या गावातील आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

डीजेवरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती : गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घडना घडली. बीडच्या शिरूर तालुक्यातील मातोरी गावातील बसस्टॅण्डवर जवळ ही दगडफेकीची घटना घडली. गावातील अनेक दुचाकी फोडल्याचं सांगितलं जात आहे. ओबीसी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके गुरुवारी भगवानगडावर जाणार होते. त्यामुळे या भागात विविध ठिकाणी कार्यक्रम होते. जागोजागी सभा देखील आयोजित करण्यात आलेल्या होत्या. हाके यांना पाडळशिंगी येथून घेण्यासाठी तिंतरवणी, माळेगाव, पारगाव या ठिकाणचे ग्रामस्थ पाडळशिंगीकडे निघालेले होते. त्यांनी सोबत आणलेल्या डीजेवर मातोरीत आल्यानंतर दोन गाणी वाजवली. काही लोकांनी याला विरोध केला. मातोरी ग्रामस्थांनी त्यांना डीजे घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र, काही तरुणांचा वाद सुरू झाल्याने दगडफेकीला सुरू झाली. यात डीजेचं तसंच दुचाकींचं देखील नुकसान झालं. घटनेची माहिती मिळताच गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

पालकमंत्री धनंजय मुंडेंचे जनतेला आवाहन : या प्रकरणी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जनतेला सामाजिक सौदार्ह राखण्याचं आवाहन करत आपल्या एक्स अकांउटवर लिहिलं की, बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात मातोरी परिसरात घडत असलेल्या घटनाक्रमावर मी लक्ष ठेवून आहे. पोलीस प्रशासनास तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश दिले आहेत. माझी बीड जिल्ह्यातील सर्व जनतेला विनंती आहे की कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, तसंच जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द बिघडू नये...

हेही वाचा

  1. ओबीसीचे नेते संरक्षण आणि आरक्षणासाठी एकत्र आले; लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंवर टीका - Laxman Hake On Jarange Patil
  2. भुजबळांचं तलवारी घासून ठेवण्याचं आवाहन, तर आम्हीही शांत बसणार नाही असा जरांगेंचा इशारा - Manoj Jarange Patil PC
  3. "... तुझा अभ्यास कमी आहे, पंचवीस वर्षापूर्वीच मुस्लिमांना आरक्षण मिळालं" - छगन भुजबळ - Chhagan Bhujbal News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.