ETV Bharat / state

महेश गायकवाड यांना आज डिस्चार्ज नाहीच, डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणीनंतर घेतला निर्णय - Rahul Patil

जुपिटर रुग्णालयातील डॉक्टरांनी महेश गायकवाड यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यादरम्यान त्यांना डॉक्टरांनी चालण्याचा सराव करायला सांगितलं. त्यामध्ये महेश यांना चालण्यासाठी त्रास जाणवला. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी ऑपरेशन केलं आहे त्या ठिकाणी अजूनही सूज असल्याने त्यांना आज डिस्चार्ज देता येणार नाही असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये डिस्चार्ज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोबतच राहुल पाटील यांचा डिस्चार्ज संध्याकाळ पर्यंत होण्याची शक्यता आहे.

Mahesh Gaikwad and Rahul Patil
महेश गायकवाड
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 16, 2024, 4:50 PM IST

ठाणे : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी जबर जखमी झालेले शिवसेनेचे माजी नगरसेवक आज अखेर आपल्या घरी जाणार होते. मात्र, ते टळले. महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे गेले १४ दिवस ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होते. यापैकी फक्त राहुल पाटील आज सायंकाळी तब्बल १४ दिवसांनी आपल्या कुटुंबात परत जाऊ शकतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महेश गायकवाडांवर रुग्णालयात 14 दिवस उपचार : महाराष्ट्राच्या उज्वल राजकीय परंपरेला काळिमा फासणारी घटना उल्हासनगर मधील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या परवानाधारी पिस्तूलातून शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर थेट पोलीस ठाण्यातच बेछूट गोळीबार केला होता. आपल्या पिस्तूलातून तब्बल दहा राऊंड फायर केल्या असता त्यातील सहा गोळ्यांनी महेश गायकवाड यांचा वेध घेतला तर दोन गोळ्या राहुल पाटील यांना लागल्या. त्या दोघांवर गेले १४ दिवस ठाण्यातील जुपिटर हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. आज अखेर त्यांच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा झालेली आढळली. त्यांना डिस्चार्ज देण्याचा डॉक्टरांनी निर्णय घेतला होता. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर तो मागे घेण्यात आला.

महेश गायकवाडांच्या समर्थकांची हॉस्पिटलबाहेर गर्दी : महेश गायकवाड आणि राहुल पाटील बाहेर येणार म्हणून जुपिटर हॉस्पिटलच्या बाहेर "गोरगरिबांचा कैवारी-टायगर इज बॅक" अशा आशयाचे बॅनर अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंसह वर वाघाचा फोटो देखील लावण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपले नेते बाहेर येणार या आनंदात अनेक कार्यकर्त्यांनी जुपिटर हॉस्पिटलच्या बाहेर आतापासूनच गर्दी करायला सुरुवात केली होती. महेश गायकवाड यांनी राहुल पाटील यांचे समर्थक यावेळी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करणार असल्याचं या गर्दीवरून स्पष्ट होत होतं. परंतु, महेश गायकवाड अजूनही ठणठणीत झाले नसल्यानं त्यांना आणखी काही दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागणार आहेत.

हेही वाचा:

  1. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचा हृदयविकारनं मृत्यू, शंभू सीमेवरील दुर्दैवी घटना
  2. "मुंबईला जाऊन फसवणूक झाली, पण...." ; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, राणेंनाही भरला दम
  3. बँक खाती गोठवल्याप्रकरणी काँग्रेसचा थयथयाट; कोर्टात मिळाला दिलासा, बुधवारपर्यंत मुदतवाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.