ETV Bharat / state

'माझे पाय दिवसाढवळ्या कार्यकर्त्यानं धुतले, पण राज्य सरकारमध्ये...'; त्या प्रकरणावर काय म्हणाले नाना पटोले? - Nana Patole - NANA PATOLE

Nana Patole : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कार्यकर्त्यानं पाय धुतल्यानं त्यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. यावरुन आता त्यांनी भाजपावरच टीका केली. मूळ मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा असं करत असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय.

नाना पटोले
नाना पटोले (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 6:16 PM IST

पनवेल (रायगड) Nana Patole : ऐन पावसाळ्यात पोलीस भरती घेऊ नका ही मागणी घेऊन पुण्यात अनेक पोलीस भरतीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. त्या मुद्द्यापासून विषय डायवर्ट करण्यासाठी नाना पाटोले यांनी पावसाच्या चिखलातील पाय कार्यकर्त्यांकडून धुतले असं दाखवलं जातंय आणि भाजपावाले यावर टीका करत आहेत, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी पनवेल इथं वासुदेव बळवंत फडके सभागृहात पदवीधर मतदार व कार्यकर्त्यांच्या रायगड जिल्हा महाविकास आघाडीच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना केलय.

नाना पटोलेंची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

तरुणांमध्ये पोलीस भरतीचा रोष : या मेळाव्यात बोलताना नाना पटोले म्हणाले, "ईडीचे आणि सीबीआयचे चिखल माखलेले लोक अंधारात पाय धुतात, या राज्य सरकारमध्ये ईडी आणि सीबीआयचे लोक आहेत. माझं तर दिवसा ढवळ्या रस्त्यावरचं काम आहे, मी कोणाला जबरदस्ती केलीय व्हिडिओ दाखवा. जो व्यक्ती पाय धुणारा होता, त्याच म्हणणं तुम्ही ऐकलं असेल." तसंच पोलीस भारतीचा तरुणांमध्ये रोष असून आंदोलन करत आहेत. एखाद्या विषयापासून लक्ष विचलित करण्यात भाजपा एक्सपर्ट आहे. भाजपावाले घाबरले आहेत. आता टार्गेट कोणाला करायचं, कधी उद्धव ठाकरे, कधी शरद पवार, तर कधी नाना पाटोले त्यांच्याकडे दुसरा पर्याय काय? अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी भाजपावर केलीय.

अनेक नेते कार्यकर्ते उपस्थित : यावेळी व्यासपीठावर शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी मंत्री नसीम खान, कोकण पदवीधर महाविकास आघाडी उमेदवार रमेश किर, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना उपनेते विजय कदम, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत पाटील, काँग्रेसचे पनवेल जिल्हाध्यक्ष आर सी घरत, पनवेलचे शहराध्यक्ष सुदाम पाटील व महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते सभागृहात उपस्थित होते.

हेही वाचा :

  1. विधान परिषद निवडणूक 2024 : महाविकास आघाडीत ठिणगी, नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंवर व्यक्त केली नाराजी, काय आहे वादाचं कारण ?
  2. राष्ट्रपती राजवटीची काँग्रेसकडून राज्यपालांकडे मागणी, राज्यातील 'या' मुद्द्यांवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित
  3. काळं कृत्य करणाऱ्यांसाठी ससून हॉस्पिटल फाइव स्टार हॉटेल झालं आहे का? नाना पटोलेंचा सवाल, पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.