कॅनेडाचा पॉप गायक जस्टिन बीबरचे आज मुंबई विमानतळावर आगमन झाले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यात बीबर गायन करणार आहे.
जस्टिन बीबर मुंबईत पोहोचला, अनंत अबांनीच्या विवाहात करणार गायन - breaking news today
Published : Jul 5, 2024, 9:13 AM IST
|Updated : Jul 5, 2024, 1:33 PM IST
'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे हे लाईव्ह पेज दिवसभर अपडेट होत असते. राज्य, देश आणि विदेशातील सर्व महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला या पेजवर पाहता आणि वाचता येतील. सर्वात पहिली आणि खात्रीशीर बातमी तुम्हाला या पेजवर वाचायला मिळेल. त्यासाठी ईटीव्ही भारतच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
LIVE FEED
जस्टिन बीबर मुंबईत पोहोचला, अनंत अबांनीच्या विवाहात करणार गायन
विराट कोहलीनं एक्स मीडियावर पोस्ट करत मुंबई पोलिसांचे मानले आभार
टी २० विश्वविजेत्या खेळाडुंची विजयी मिरवणूक काढली. विराट कोहलीनं एक्स मीडियावर पोस्ट करत मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांचे आभार मानले. विराटनं एक्स मीडियावर पोस्ट करत म्हटले, "सर्व अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार. त्यांनी विजयी परेड दरम्यान अभूतपूर्व कामगिरी केली. तुमचे समर्पण आणि सेवा अत्यंत प्रशंसनीय आहे. जय हिंद."
राज्याच्या मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक, महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. राज्यात महिलांसाठी पिंक रिक्षा राबवण्याबाबत महत्त्वाचा निर्णय आजच्या बैठकीत घेतला जाणार आहे. राज्यातील एसइबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील मुलींना शैक्षणिक शुल्कात 50 टक्के सवलत दिली जाते. ही सवलत यापुढे शंभर टक्के देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेतला जाणार आहे. राज्याचे पर्यटन धोरण ठरविण्याबाबतचा निर्णयही आजच्या बैठकीत घेतला जाणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीकरिता सातारा पॅटर्न राबविणार- शंभूराज देसाई
मंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर महत्त्वाची घोषणा केली आहे. मंत्री देसाई म्हणाले, " महिलांना कोठेही अर्ज करायला जायची गरज नाही. सातारा पॅटर्न म्हणून आपण चालविणार आहोत. त्यासाठी पथक तयार केले आहे. अर्ज भरण्यासाठी महिलांना कोठही जावे लागणार नाही. आमच्या टीमधील सदस्य घरी जाऊन नारी शक्ती अर्ज भरणार आहेत. महिलांना रांगेत उभे राहण्याची गरज लागणार नाही."
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रथमच देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंशी पंतप्रधानांनी साधला संवाद
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रथमच देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, " तुम्ही सर्वोत्तम कामगिरीसाठी जात आहोत. ऑलिम्पिक हे शिकण्याचे खूप मोठे क्षेत्र आहे. शिकण्याच्या वृत्तीने काम करणाऱ्यासाठी शिकण्याच्या अनेक संधी आहेत. मला खात्री आहे की यावेळीही तुम्ही क्रीडा क्षेत्रात भारताला गौरव मिळवून द्याल."
ठाण्यात ९ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार, खून केल्यानंतर नराधमाला अटक
9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. अभय यादव (४२) असे आरोपीचे नाव आहे. त्यानं गुरुवारी दुपारी बालिकेचे अपहरण करून बलात्कार करून तिचा गळा आवळून खून केला.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी निवडणुकीत स्वीकारला पराभव, उद्या देणार राजीनामा
लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सार्वत्रिक निवडणुकीत पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे सर कीर स्टारर हे ब्रिटनचे पुढील राष्ट्राध्यक्ष असणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. ऋषी सुनक हे शनिवारी पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार आहेत. ऋषी सुनक यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची संधी मिळते का, याकडं भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागलेलं होते.
खेळाडुंच्या स्वागतासाठी मुंबईवरून बस आणून काय दाखविण्याचा प्रयत्न केला? संजय राऊतांची भाजपावर टीका
खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील खेळाडुंच्या विजयोत्सवावरून भाजपावर निशाणा साधला. शिवसेना टाकरे गटाचे नेते राऊत म्हणाले, " मराठी आणि गुजराती हा मुंबईत वाद नाही. मुंबईला कमी दाखविण्याचा प्रयत्न आहे. खेळाडुंच्या स्वागतासाठी मुंबईवरून बस आणून काय दाखविण्याचा प्रयत्न केला आहे? मुंबईत बस नव्हती, तर एका दिवसात बस बनविली असती. बेस्टच्या ताफ्यात अशी बस आहे. मोदी-शाह हेच मराठी-गुजरातीमध्ये वाद लावत आहे.
पीडितांच्या नातेवाईकांना अधिक नुकसान भरपाई मिळावी-राहुल गांधी
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हाथरस चेंगराचेंगरी दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांच्या नातेवाईकांची भेट घेतलीय. खासदार राहुल गांधी म्हणाले, "दुर्घटनेत अनेकांचे मृत्यू झाले आहेत. मला दुर्घटनेचे राजकारण करायचे नाही. व्यवस्थेत उणीवा आहेत. पीडितांच्या नातेवाईकांना अधिक नुकसान भरपाई मिळावी. कारण ही कुटुंबे खूप गरीब आहेत."
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जीएसएम ट्रॅकरसह 10 गिधाडांना टॅग
नागपूर- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात (टीएटीआर) दहा पांढऱ्या रंगाच्या गिधाडांना जीएसएम ट्रॅकरने टॅग करण्यात आलं आहे. गिधाडांची ही प्रजाती गंभीर संकटात सापडलेली आहे. TATR क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी सांगितलं की, " हरियाणाच्या पिंजोर येथील बीएनएचएस व्हल्चर कन्झर्व्हेशन अँड ब्रीडिंग सेंटरमधून दहा पांढऱ्या रंगाच्या गिधाडांना (जिप्स बेंगालेन्सिस) आणण्यात आले. त्यांना GSM-आधारित ट्रॅकिंग उपकरणांसह यशस्वीरित्या टॅग करण्यात आले. त्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि स्थानिक वन विभागाचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले."