ETV Bharat / state

महादेव ॲप प्रकरण : अभिनेता साहिल खानची ३ तास झाली कसून चौकशी - Mahadev Betting App Case - MAHADEV BETTING APP CASE

Mahadev Betting App Case : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी आज बॉलीवूड अभिनेता साहिल खानची (Actor Sahil Khan) एसआयटीकडून (SIT Inquiry) तीन तास चौकशी करण्यात आली.

Mahadev Betting App Case
अभिनेता साहिल खान चौकशी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 13, 2024, 1:29 PM IST

Updated : Apr 13, 2024, 7:41 PM IST

अभिनेता साहिल खानची एसआयटी कडून चौकशी

मुंबई Mahadev Betting App Case : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी मुंबई पोलीसांनी आज बॉलिवूड अभिनेता साहिल खानचा (Actor Sahil Khan) जबाब नोंदवला आहे. 15 हजार कोटींच्या महादेव सट्टेबाज प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या एसआयटीनं (SIT Inquiry) तीन तास साहिल खानची कसून चौकशी केलीय. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एसआयटीच्या चौकशीला उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळं मी उपस्थित राहिलो आणि तपासात सहकार्य केलं. यापुढेही चौकशीला हजर राहून सहकार्य करणार असल्याची माहिती, अभिनेता साहिल खाननं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

35 जणांविरुद्ध गुन्हा दाखल : हा गुन्हा मुंबईच्या माटुंगा पोलिसांनी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रथम नोंदवला होता. त्यानंतर तो तपासासाठी गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडं वर्ग करण्यात आला आणि त्यानंतर एसआयटी स्थापन करून पुढील तपास करण्यात येत आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकाला अटक करण्यात आलीय. मुंबई पोलिसांनी महादेव बेटिंग ॲपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर, रवी उपल, सुभम सोनी यांच्यासह 35 जणांविरुद्ध 15 हजार कोटींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केलाय.

पहिली अटक : दीक्षित कोठारी या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या तपास पथकाने पहिली अटक केली होती. अभिनेता साहिल खान याची देखील आरोपी म्हणून या गुन्ह्यात नोंद करण्यात आली आहे. त्यामुळं पुन्हा खिलाडी अँपविरुद्ध दाखल माटुंगा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात बॉलिवूडचे काही तारे गुंतले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

15 हजार कोटींची फसवणूक : कोर्टाच्या आदेशानुसार, माटुंगा पोलिसांनी तक्रारदार प्रकाश बनकर यांच्या जबाब घेऊन एफआयआर नोंदवला होता. महादेव ॲपची उपकंपनी असलेल्या खिलाडी ॲपचा प्रवर्तकासह उद्योगपती मोहित बर्मन आणि गौरव बर्मन यांच्यासह 32 आरोपींची नावे या गुन्ह्यात समाविष्ट आहेत. कुर्ला दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्देशानुसार खिलाडी अँप विरोधात मंगळवारी 7 नोव्हेंबरला माटुंगा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. एफआयआरमध्ये, माटुंग्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी आरोप केला होता की, 2019 पासून ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप्सद्वारे आतापर्यंत अंदाजे 15 हजार कोटींची फसवणूक करण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. महादेव बेटिंग ॲपचं मुंबई कनेक्शन, एसआयटीने पहिल्या आरोपीला ठोकल्या बेड्या
  2. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात अभिनेता साहिल खानसह तिघे चौकशीसाठी गैरहजर
  3. सुधाकर बडगुजर प्रकरणाची संपूर्ण एसआयटी चौकशी लावू- देवेंद्र फडणवीस

Last Updated : Apr 13, 2024, 7:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.