ETV Bharat / state

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट, राज्य सरकार बरखास्तीची मागणी

Mahavikas Aghadi met Governor : भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केलेला गोळीबार, मुंबईत माजी नगरसेवकाची झालेली हत्या, पुण्यात सामाजिक कार्यकर्त्यांवर झालेला हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळं महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं आज राज्यपालांची भेट घेऊन सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

Mahavikas Aghadi met Governor
Mahavikas Aghadi met Governor
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2024, 9:46 PM IST

जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

मुंबई Mahavikas Aghadi met Governor : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ठाकरे गटाचे दहिसर येथील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

बंदुकीची श्वेतपत्रिका काढा : यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे असं सांगितलं. गुन्हेगारी नियंत्रित करण्यात अपयशी ठरलेलं राज्य सरकार बरखास्त करावं, अशी मागणी राज्यपालांकडं केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांना बोलताना ‘तुमच्या पालकांना 'मला' मतदान करण्यास सांगा नाहीतर मी दोन दिवस जेवणार नाही’, असं शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी म्हटलं होतं. त्यावर आव्हाड म्हणाले, संतोष बांगर जोकर आहेत. त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा ठेवता येईल. घाबरलेलं सरकार विरोधकांना घाबरवण्याचं काम करत असून त्यांनी आम्हाला गोळ्या घातल्या, तरी आम्ही संविधान वाचण्याचा प्रयत्न करू, असा टोला त्यांनी सरकारला लगावला आहे. सरकारनं 20 ते 25 लाखांत बंदुकीचे परवाने दिले आहेत. बंदुकीचे परवाने कोणी दिले? याची माहिती देण्यासाठी सरकारनं श्वेतपत्रिका काढावी, असं देखील आव्हाड यांनी म्हटलंय.

राज्यात गुंडा राज सुरू : यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, कायदा, सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत आम्ही दोन महिन्यांपूर्वी राज्यपालांची भेट घेतली होती. राज्यात नवीन अधिकारी आल्यापासून कायदा, सुव्यवस्था ढासळली आहे. राज्यात गुंडगिरी सुरू असून बंदुकीच्या जोरावर दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. आज राज्यपालांची भेट घेऊन सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली.

हे वाचलंत का :

  1. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून उद्धव ठाकरेंची बोचरी टीका, आता फडणवीसांनीही दिलं सणसणीत उत्तर
  2. फारुकी फर्मान बघताच राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला, म्हणाले...
  3. "राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का?", उद्धव ठाकरे आक्रमक; राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.