ETV Bharat / state

Mohol And Mulik Meeting : मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक यांच्यात दिलजमाई; मेधा कुलकर्णींचीही घेतली भेट - Medha Kulkarni

Mohol And Mulik Meeting : पुण्यातून भाजपाकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपाचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक नाराज असल्याचं बोललं जात होतं. मात्र, मोहोळ यांनी आज (16 मार्च) जगदीश मुळीकांची भेट घेत मतभेद मिटवले असल्याचं सांगितलं.

Mohol And Mulik Meeting
मेधा कुलकर्णींचीही घेतली भेट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 16, 2024, 8:00 PM IST

मेधा कुलकर्णी लोकसभा उमेदवारीविषयी सांगताना

पुणे Mohol And Mulik Meeting : दोन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने राज्यातील 20 जणांची यादी जाहीर केली. त्या यादीत पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांना उमेदवारी दिल्यानंतर पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून इच्छुक असलेले भाजपाचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच आज (16 मार्च) मोहोळ यांनी जगदीश मुळीकांची भेट घेत त्यांची दिलजमाई झाली असल्याचं सांगितलं जात आहे.

मोहोळ यांनी घेतली कुलकर्णींची भेट : आज (16 मार्च) भाजपाचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची गळाभेट घेतली आहे. आता जगदीश मुळीक लवकरच प्रचारात सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसंच राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार मेधा कुलकर्णी आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात देखील काही वर्षांपासून वाद-विवाद होते; पण आता मोहोळ यांनी मेधा कुलकर्णी यांची देखील भेट घेतली आहे.

पुण्यात सर्वाधिक मताधिक्याने जिंकू-मेधा कुलकर्णी : नुकतचं निवडणूक आयोगाने देशभरातील लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलय. राज्यात 5 टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. पुण्यात महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांची भेट देखील घेतली. या भेटीनंतर मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, आमच्या पक्षात कोणतीही नाराजी नसून आमचा उमेदवार हा कमळ चिन्हावरच निवडणूक लढवतो." यंदा पुणे लोकसभा मतदारसंघात आम्ही सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

तर जास्त मताधिक्यानं निवडून येऊ : यावेळी मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, 13 तारखेला पुणे शहरात निवडणूक असून आम्ही या निवडणुकीसाठी तयार आहोत. आजही जर पुणे लोकसभेची निवडणूक घेतली तर मुरलीधर मोहोळ हे मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार याची खात्री आहे..

हेही वाचा :

  1. Cabinet Meeting : आचारसंहितेपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत 17 निर्णय; सगेसोयरे व्याख्येबाबत चार महिन्यात कार्यवाही करणार - मुख्यमंत्री
  2. Maratha Kranti Morcha : जरांगेंनी सांगितल्याप्रमाणे मराठा उमेदवारांनी निवडणुकीला उभे करु नये, काही मराठा संघटनांचं मत
  3. Rahul Gandhi: इलोक्टोरल बाँड्सवरुन राहुल गांधींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.