अंबाला Womens Day 2024 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रेल्वे विभागाने महिलांच्या सन्मानासाठी विशेष पुढाकार घेतलाय. शुक्रवारी महिला दिनानिमीत्त महिलांनी अंबाला कॅन्ट ते लुधियाना ही ट्रेन चालवली. या ट्रेनमध्ये लोको पायलट, अतिरिक्त लोको पायलट आणि गार्ड महिला होत्या. यावेळी अंबाला रेल्वे विभागाचे एडीआरएम, वरिष्ठ डीसीएम आणि इतर अधिकारीही उपस्थित होते.
कमात समतोल राखणं हे खूप अवघड काम : लोको पायलट मनोरमा वर्मा म्हणाल्या, "मला खूप आनंद वाटला. महिला या कामापर्यंत येणं ही खूप चांगली गोष्ट आहे. आम्ही लोको पायलट आहोत याचा आम्हाला अभिमान वाटतो. महिलांसाठी कुटुंब हे कामाच्या ठिकाणासारखं आहे. या कामात समतोल राखणं हे खूप अवघड काम आहे. कारण आमच्याकडे रात्रंदिवस ड्युटी असते. त्यामुळे कुटुंबासाठी वेळ काढणं अवघड होतं. मला रेल्वे कर्मचाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळतो. मला कमी काम मिळावं आणि घरी जाता यावं यासाठी त्यांचा नेहमी सपोर्ट असतो. मला नाईट शिफ्ट दिली जात नाही. जेणेकरून मी माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकेन."
अंबाला कॅन्ट रेल्वे स्टेशन ते लुधियानापर्यंत ट्रेन धावली : अंबाला रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, "महिला दिनानिमित्त अंबाला विभागाने खास ट्रेन चालवली. अंबाला ते लुधियानापर्यंत महिला कर्मचाऱ्यांनी ही खास ट्रेन चालवलीय. एलपी, एएलपी आणि गार्ड या सर्व तीन महिला होत्या. त्याचप्रमाणे मोहाली स्थानक निवडलं गेलं आहे, ज्यामध्ये संपूर्ण कर्मचारी महिला असाव्यात." तसंच, अंबाला रेल्वे विभागाचे वरिष्ठ डीसीएम महिलांना संदेश देताना म्हणाले की, "महिलांनी स्वत:ला पुरुषांपेक्षा कमी समजू नये. शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं साधन आहे, जे प्रत्येक स्त्रीकडे असायला हवं." त्यांनी महिलांच्या पालकांनाही संदेश दिला की त्यांनी आपल्या मुलींना शिक्षण द्या म्हणजे त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील. आज असं कोणतंही क्षेत्र नाही ज्यामध्ये महिलांनी आपली छाप सोडलेली नाही. तसंच, महिला प्रगती करतील तसा देशही प्रगती करेल, असंही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा :
1 काँग्रेसनं लोकसभेसाठी 39 उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर; राहुल गांधी वायनाडमधूनच रिंगणात
2 टीकेचा वार, शरद पवार! कायम पवारच का होतात विरोधकांचे टार्गेट? वाचा खास रिपोर्ट
3 केदारनाथ धाम भाविकांसाठी आनंदाची बातमी! दरवाजे 'या' तारखेला उघडले जाणार