मुंबई Mumbai Nhava Sheva Port : वृत्तसंस्था 'पीटीआय'नं दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 23 जानेवारी रोजी 'सीएमए सीजीएम अटिला' या माल्टा ध्वजांकित व्यापारी जहाजाला थांबवलं होतं. मात्र, आता याबाबत नवीन माहिती समोर आलीय. हे जहाज कराचीला जात होतं. त्यावर इटालियन कंपनीचं कम्प्यूटर न्यूमेरिकल कंट्रोल मशीन होतं. यानंतर 'डीआरडीओ'च्या पथकानं जहाजावरील मशीन आणि इतर वस्तूंचीही तपासणी केली. पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात 'सीएनसी' मशीनचा वापर केला जाऊ शकतो, यासंदर्भात 'डीआरडीओ'च्या टीमनं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान हे युरोप आणि अमेरिकेतून प्रतिबंधित वस्तू आणण्यासाठी चीनची मदत घेत आहे,
तैयुआन मायनिंग कंपनीनं पाठवलं जहाज : जहाजाशी संबंधित कागदपत्रांनुसार, हा माल शांघाय जेएक्सई लॉजिस्टिक कंपनीकडून पाठवण्यात आला होता आणि तो सियालकोटमधील पाकिस्तान विंग्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे पोहोचला होता. मात्र, तपासाअंती सुरक्षा अधिकाऱ्यांनी जहाजावरील सामानाचं वजन 22 हजार किलोपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं. ते तैयुआन मायनिंग कंपनीने पाठवलं होतं आणि ते पाकिस्तानच्या कॉसमॉस इंजिनिअरिंग कंपनीपर्यंत पोहोचणार होतं.
वस्तू इटलीहून जहाजानं कराचीत आणण्याचा प्रयत्न : बंदरावर उपस्थित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती भारताच्या विशेष गुप्तचर अधिकाऱ्यांना दिली. यानंतर या अधिकाऱ्यांनी जहाजातील मालाची पुन्हा तपासणी करून तो माल जप्त केलाय. कॉसमॉस इंजिनिअरिंग कंपनी ही पाकिस्तानची संरक्षण पुरवठादार आहे. मार्च 2022 मध्ये कंपनीने थर्मोइलेक्ट्रिक वस्तू इटलीहून जहाजाने कराचीत आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती कंपनी यामध्ये सहभागी झाली होती.
सीएनसी मशीन्स म्हणजे काय? : सीएनसी मशीन प्रीप्रोग्राम केलेल्या संगणक सॉफ्टवेअरद्वारे मशीन टूल्सचा वेग आणि अचूकता नियंत्रित करतात. हे नागरी आणि लष्करी दोन्ही संबंधात वापरले जाऊ शकते. 1996 पासून, वासेनार व्यवस्थेमध्ये सीएनसी मशीनचा समावेश करण्यात आला. ही एक आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र नियंत्रण प्रणाली आहे, ज्याचा उद्देश नागरी आणि लष्करी दोन्ही हेतूंसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचा प्रसार रोखणं हा आहे. पारंपरिक शस्त्रास्त्रे आणि दुहेरी वापराच्या वस्तू आणि तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाशी संबंधित माहिती सामायिक करणाऱ्या 42 सदस्य देशांपैकी भारत एक आहे.
हेही वाचा :
1 भाजपानं विश्वासघात केला, संजय राऊतांची देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांच्यावर टीका
2 "आपके साथ रहेंगे अब इधर-उधर नहीं जाएंगे"; नितीश कुमारांच्या विधानावर पंतप्रधानांना हसू आवरेना
3 भाजपानं महाराष्ट्रावर लक्ष वाढवलं; जे.पी नड्डांपाठोपाठ अमित शाह विदर्भ दौऱ्यावर