मुंबई Heavy Security On Gateway Of India : रविवारची सुटी असल्यानं मुंबईतील गेट वे परिसरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या असते. मात्र तुम्हीही आज मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात फिरायला जाण्याचा बेत करत असला, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात महाविकास आघाडीनं सरकार विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मालवण इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आज हे आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे गेट वे ऑफ परिसर पर्यटकांसाठी आज बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांचा मोठा हिरमोड होण्याची शक्यता आहे.
गेट वे ऑफ इंडिया परिसरात आंदोलन : महाविकास आघाडीच्या वतीनं आज मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनकांनी मोठ्या प्रमाणात गेट वे ऑफ इंडिया परिसरात गर्दी केली. त्यामुळे महाविकास आघाडीचं आंदोलन लक्षात घेता पुढील आदेशापर्यंत सकाळी 10 वाजतापासून गेटवे ऑफ इंडिया परिसर पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे नेते गेट वे ऑफ इंडिया इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गेट वे ऑफ इंडिया परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त : महाविकास आगाडीच्या वतीनं आज गेट वे ऑफ इंडिया परिसरात आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी हा परिसर बंद ठेवण्यात आला आहे. गेट वे ऑफ इंडिया परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी सुटी असल्यानं अनेक पर्यटक गेट वे ऑफ इंडिया परिसरात येतात. मात्र आज त्यांना या ऐतिहासिक वास्तूचं दर्शन घेण्याची संधी मिळणार नाही. हुतात्मा चौक इथं महाविकास आघाडीचं आंदोलन असल्यानं मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल, एटीएस, वाहतूक नियंत्रण पथक आदी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा :