ETV Bharat / state

कोल्हापूरला महापुराचा धोका?; पंचगंगा धोका पातळीकडे मार्गक्रमण, राधानगरी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार... - Kolhapur Rain Update - KOLHAPUR RAIN UPDATE

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात सुरू असलेल्या धुंवाधार पावसामुळं कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेली पंचगंगा नदी दुथडी भरुन वाहत आहे. तर सध्या नदी धोका पातळीच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे.

Kolhapur Rain Update
पंचगंगा नदी (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 24, 2024, 10:08 PM IST

कोल्हापूर Kolhapur Rain Update : जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदी (Panchganga River) सध्या धोका पातळीच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. राधानगरी धरण सध्या 92 टक्के भरलं आहे. तर अधिक पाणीसाठा होत असल्यानं कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे. यंदाही कोल्हापूरकरांना महापुराची धास्ती जाणवत आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांनी स्थलांतर सुरू केलं असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

अनेक नद्यांना आला पूर : जिल्ह्यात काही प्रमाणात उसंत घेतलेल्या पावसानं मंगळवारी मध्यरात्रीपासून पुन्हा धुंवाधार सुरुवात केली आहे. परिणामी जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदी सध्या 42 फुटांवरून वाहत असून धोकापातळी ओलांडण्यासाठी अवघ्या एक फूट पाण्याची आवश्यकता आहे. तासाला एक इंचाने पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत आहे. संथ गतीनं वाढणाऱ्या पाण्यामुळं कोल्हापूर शहरालगत असलेल्या प्रयाग, चिखली, आंबेवाडी गावातील पूरग्रस्तांनी स्थलांतर सुरू केलं आहे. जिल्हा प्रशासनानेही सोनतळी भागात पूरग्रस्तांसाठी आरोग्य पथक पशुवैद्यकीय सेवा तैनात केली आहे. महापुराची स्थिती उद्भवल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज असल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी सांगितलं.

जिल्ह्यातील वाहतूक मार्ग झाले बंद : पंचगंगेच्या पाणीपातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील केर्ली येथे पाणी आल्यानं हा मार्ग बंद करण्यात आला आहे. जोतिबा-पन्हाळा मार्गे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. तर एसटी महामंडळाच्या 12 मार्गावरील 25 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळं महामंडळाला साडेतीन कोटींचं नुकसान झालं आहे.

कोल्हापूर शहरातील 102 कुटुंबांचं स्थलांतर : पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं कोल्हापूर महापालिका आणि अग्निशमन दलाच्या वतीनं शहरातील जामदार क्लब, गायकवाड वाडा, सुतार वाडा, लक्ष्मीपुरी कुंभार गल्ली या भागातील 102 कुटुंबांचं स्थलांतर केलं आहे. या नागरिकांची व्यवस्था दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ, महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आली आहे.

दूधसंकलनाला अतिवृष्टीचा फटका : जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं याचा थेट परिणाम दूध संकलनावर झाला आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या दैनंदिन दूध संकलनात 15 हजार लिटरने घट झाली आहे. वाहतूक व्यवस्था कोलमडल्यानं अतिवृष्टीचा दूध संकलनाला फटका बसला आहे.

हेही वाचा -

  1. पंचगंगा नदी इशारा पातळी गाठायला 'इतके' फूट बाकी; तब्बल 38 बंधारे पाण्याखाली - Panchganga River
  2. Kolhapur Flood: पूर पाहायला गेलेला तरुण नदीच्या पुरात रात्रभर अडकला, बचाव पथकाने 'अशी' केली सुटका
  3. कोल्हापुरात पावसाची बॅटींग; पंचगंगा नदीचा 'इशारा', विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित - kolhapur Rain

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.