नवी दिल्ली Farmer Protest : शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारुन दिल्लीकडं कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं पोलीस प्रशासनानं दिल्लीला लागून असलेल्या सर्व सीमा सील केल्या आहेत. दिल्ली ते हरियाणाचा रस्ता सील करण्यात आला आहे. त्याचबरोबर हरियाणातून दिल्लीकडं येणारा रस्ताही सील करण्यात आला आहे. मात्र शेतकरी संघटना आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.
![शेतकरी आंदोलन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14-02-2024/20745272_farmerdelhi-7.jpg)
1) दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. सिंघू, टिकरी, गाझीपूर आणि शंभू या सीमांना पूर्णपणे छावण्यांचं स्वरूप आलं आहे.
![शेतकरी आंदोलन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14-02-2024/20745272_farmerdelhi-5.jpg)
2) दिल्ली मेट्रोच्या अनेक स्थानकांवर गेट बंद करण्यात आले आहेत.
![शेतकरी आंदोलन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14-02-2024/20745272_farmerdelhi-10.jpg)
3) दिल्ली, नोएडा आणि गुरुग्राममध्ये अनेक ठिकाणी लांबच लांब ट्रॅफिक जाम असून सर्वसामान्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतय.
![शेतकरी आंदोलन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14-02-2024/20745272_farmerdelhi-4.jpg)
4) एमएसपी (MSP) हमीभावासह अनेक मागण्यांवर शेतकरी ठाम आहेत. "आम्ही नाही तर सरकारनं रस्ता अडवला आहे," असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
![शेतकरी आंदोलन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14-02-2024/20745272_farmerdelhi-6.jpg)
5) "आम्हाला संघर्ष नको, आम्ही शांततापूर्ण आंदोलनाच्या बाजूनं आहोत. केंद्र सरकार आमच्या मागण्यांबाबत अजिबात गंभीर नाही," असंही शेतकरी नेते सांगत आहेत.
![शेतकरी आंदोलन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14-02-2024/20745272_farmerdelhi-8.jpg)
6) "आम्ही शेतकरी धान्य पिकवतो आणि सरकार खिळे ठोकण्याचं काम करत आहे. आम्ही लाठ्या आणि अगदी गोळ्यांचा सामना करण्यास तयार आहोत. सरकार फक्त दावा करतं की, त्यांना शेतकऱ्यांची काळजी आहे, पण तसं अजिबात नाही," अशी खंतही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
![शेतकरी आंदोलन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14-02-2024/20745272_farmerdelhi-3.jpg)
7) दिल्ली-एनसीआर सीमेवर सुमारे 18 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांसह रॅपिड ॲक्शन फोर्स, सीआयएसएफ, बीएसएफचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.
![शेतकरी आंदोलन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14-02-2024/20745272_farmerdelhi-2.jpg)
8) शेतकऱ्यांचा विरोध पाहता दिल्ली सरकारनं बवाना स्टेडियमचे जेलमध्ये रुपांतर करण्याचा केंद्राचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
![शेतकरी आंदोलन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14-02-2024/20745272_farmerdelhi-9.jpg)
9) सुरक्षा दलाचे जवान ड्रोनच्या माध्यमातूनही नजर ठेवत आहेत. सीमेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवूनही परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
![शेतकरी आंदोलन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14-02-2024/20745272_farmerdelhi-1.jpg)
10) काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या? : एमएसपीसाठी (MSP) कायदेशीर हमी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागं घेणं, लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय, या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यामुळे हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
हेही वाचा :
3 कतारमध्ये अडकलेल्या माजी अधिकाऱ्यांना शाहरुख खाननं सोडवलं? किंग खानच्या टीमनं केला खुलासा