ETV Bharat / state

दुष्काळी बीड जिल्ह्यात रेशीम बाग जगवताना कशी करावी लागली कसरत? जाणून घ्या, शेतकऱ्यांच्या व्यथा... - Silk Farming In Beed - SILK FARMING IN BEED

Silk Farming In Beed : बीड जिल्ह्यात मागील वर्षी कमी पाऊस पडल्याने रेशीम बाग व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची तारेवरची कसरत चालू आहे. जिल्ह्यात अनेक भागातील रेशीम बागा जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बीडच्या गेवराई तालुक्यातील पूर्वी या गावात काँग्रेसचे नाना पटोले हे शेतकऱ्याच्या बांधावर येऊन गेले. शेतकऱ्यांच्या व्यथा देखील त्यांनी जाणून घेतल्या; मात्र या ठिकाणची रेशीम शेती उध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झालायं. या पिकाला कुठलेही विमा संरक्षण नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. याविषयी काय म्हणतात शेतकरी हे आपण पाहूया....

Silk Farming In Beed
रेशीम बागेतील पीक वाळलं (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 2, 2024, 8:25 PM IST

Updated : Jun 2, 2024, 8:41 PM IST

बीड Silk Farming In Beed : जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात कधी अतिवृष्टी तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करावा लागतो; अत्यंत कमी कालावधीत आणि कमी खर्चात उत्पादन घेण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात विविध उपक्रम राबवत असतो. त्यामध्येच रेशीम उद्योग हा देखील एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखला जातो. बीड जिल्ह्यात 4 हजार 443 शेतकऱ्यांनी 4 हजार 748 एकरावर रेशीम लागवड केली आहे. मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने शेतकरी मेटाकुटीला आलाय.

दुष्काळामुळे रेशीम बागेची झालेली दुरावस्था सांगताना शेतकरी (ETV Bharat Reporter)

पाऊस कमी पडल्याने तुती जळून राख : गेल्या दोन वर्षांपूर्वी आम्ही रेशीम लागवड केलेली आहे. रोप लागवडीसाठी 50 ते 60 हजार रुपये खर्च आला. शेड बांधणीसाठी अडीच लाख रुपये खर्च आला तर रॅक बनवण्यासाठी दीड लाख रुपये खर्च आला. जवळपास चार ते साडेचार लाख रुपये खर्च झाला; मात्र उत्पादन एक लाख रुपये निघाले. त्यामुळे आम्ही अडचणीत सापडले आहे. यावर्षी तर पाऊस कमी पडल्यामुळे एक एकर मधील तुती जळून गेली तर एक एकरमध्ये किती ठिबकद्वारे पाणी देऊन कशी तरी जगवले आहे; कारण याचा झालेला खर्च तरी निघावा अशी आमची अपेक्षा आहे. या पिकाला विमा संरक्षण नाही. त्यामुळे आमचे अतोनात नुकसान होत आहे. सरकारकडे आमची मागणी आहे की, या पिकाला विमा संरक्षण लागू करावे.

पिकाला विमा संरक्षण लागू करण्याची मागणी : माझे शिक्षण झालेले आहे; मात्र अनेक वेळा प्रयत्न करून देखील नोकरी लागली नाही. त्यामुळे वडिलोपार्जित शेती आहे ती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये रेशीम उद्योग करण्यासाठी आम्ही हा सर्व खटाटोप केला आहे. काही मित्रांकडून माहिती घेतली आणि रेशीम उद्योग चालू केला. दोन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या रेशीम शेतीत खर्च मात्र भरपूर झाला, परंतु उत्पादनच निघालं नाही. त्यामुळे आम्ही अडचणीत सापडलो आहोत. यावर्षी तर पाऊस कमी असल्यामुळे एक एकर तुती जळून गेली आहे आणि एक एकर कशीतरी ठिबकवर जगवली आहे. त्यामुळे सरकारकडे आमची एक मागणी आहे की, या पिकाला विमा संरक्षण लागू करावे. जेणेकरून आमचे होणारे नुकसान तरी टळेल आणि आमच्या शेतीला हातभार लागेल. सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यावं अशीच आमची मागणी आहे.

आम्ही रेशीम लागवड केलेली आहे. याच्यासाठी खूप मेहनत घेतली. माझे पती रात्रं-दिवस ही रेशीम शेती जगवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. रात्री मी रात्री लाईट आल्यानंतर पाणी चालू करतात. खत घातलं, औषधे फवारली. यासाठी खूप मेहनत केली. शेडसाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला तो ही खर्च निघाला नाही. त्यामुळे आम्ही अडचणी सापडलो. तळहातातल्या फोडासारखं याला जपलं आहे. सरकारकडे आमची मागणी आहे की, आम्हाला काहीतरी मदत करावी. झालेला खर्च तरी निघावा अशी आमची अपेक्षा आहे. --- सुमित्रा रमेश शिंदे

हेही वाचा :

  1. मान्सूनमध्ये महाराष्ट्रात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडण्याची शक्यता; शेतकऱ्यांनी कधी पेरणी करावी? - Maharashtra Weather Forecast
  2. हजारो निराधारांवर कोसळला दुःखाचा डोंगर; द्वारकामाई वृद्धाश्रमाचे संस्थापक श्रीनिवास यांचं निधन - Shirdi Srinivas Passed Away
  3. "देश वाचवण्यासाठी मी तुरुंगात जातोय"; 21 दिवसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं तिहार कारागृहात आत्मसमर्पण - CM Arvind kejriwal surrendering

Last Updated : Jun 2, 2024, 8:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.