ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक 2024: एकनाथ शिंदेंची शिवसेना ठाकरेंचा 'मुंबई' बालेकिल्ला करणार काबिज ? जाणून घ्या शिंदे गटाचं टार्गेट काय? - Assembly Election 2024 - ASSEMBLY ELECTION 2024

Assembly Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाकालील शिवसेनेनं आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेनेनं उबाठा गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबईवर आपलं लक्ष्य केंद्रीत केलं आहे.

Assembly Election 2024
संपादित छायाचित्र (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2024, 4:28 PM IST

मुंबई Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांची वंचित आणि आणि तिसरी आघाडी म्हणजे परिवर्तन आघाडी यांनीही निवडणुकीसाठी जोर लावला. शिवसेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकतीच जनसंवाद यात्रा काढली. यानंतर आता राज्यातील पाच विभागात 'महाविजय संवाद' यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे. यात महिला आघाडी, सोशल मीडिया आणि युवासेना या प्रमुख आघाड्या यात्रेत असणार आहेत. मुख्य म्हणजे मराठवाडा आणि मुंबईवर विधानसभा निवडणुकीत शिंदे गटानं लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे उबाठा गटाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मुंबई शह देण्यासाठी आता शिवसेनेनं कंबर कसली आहे.

Assembly Election 2024
संपादित छायाचित्र (Reporter)

दररोज घेणार 6 विधानसभांचा आढावा : दरम्यान, "'महाविजय संवाद' यात्रेच्या माध्यमातून 5 विभागात जाऊन गाठीभेटी घेणं, मेळावे, सभा आम्ही घेणार आहोत. दररोज 6 विधानसभांचा आढावा असून, यात शाखा भेटी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी सुद्धा संवाद साधला जाणार आहे. नवरात्रौत्सवात मुंबई आणि आसपासच्या विधानसभा मतदार संघाना भेटी दिल्या जातील. 13 ऑक्टोबरनंतर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशी शिवसेनेची यात्रा असणार आहे. दरम्यान, महायुती सरकारनं विविध योजना आणल्या. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, मुलींना मोफत शिक्षण या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या आहेत का?, याचा आढावा महिला आघाडी घेईल," अशी माहिती शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. तसेच मुख्यत: विधानसभा निवडणुकीत मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईवर लक्ष केंद्रीत करण्यात येईल, असंही खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या मुंबईवर शिंदेंची सेना झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

मुंबईचा गड कोण राखणार? : मुळात शिवसेना फुटीनंतर शिंदे गट पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरं जात आहे. "लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं फेक नरेटिव्ह तयार करुन त्यांना मत मिळवण्यात यश आलं. मात्र आता विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती दिसणार नाही. सरकारनं अनेक लोक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मी गाव-खेड्यात जातोय. जनसंवाद यात्रेतून मी लोकांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी उत्तम प्रतिसाद सरकारला आहे. आम्ही मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईवर अधिकाधिक फोकस करत आहोत", अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळं अनेक वर्षापासून मुंबई हा उबाठाचा बालेकिल्ला समजला जातो. त्याच बालेकिल्ल्यात शिवसेना घुसणार का? किंवा मुंबईचा गड ठाकरे राखणार? की शिंदेंची सेना काबिज करणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कोण सर करणार मुंबईचा बालेकिल्ला ? : शिवसेनेत मोठे बंड झाले. "एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली आणि भाजपासोबत सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांची ही कृती अनेकांना पटली नाही. याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत दिसून आला. त्यामुळे महायुती सरकार आम्ही किती चांगलं काम करतोय, असं टाहो फोडून सांगत असलं, तरी मुंबईकरांच्या मनात शिंदे विषयी संताप आहे. त्यामुळं ठाकरेंचा बालेकिल्ला, तो ठाकरे यांच्याकडंच राहील, थोडंफार परिवर्तन होईल. मात्र संपूर्ण मुंबईचा बालेकिल्ला हा शिंदे काबीज करतील, असं मला वाटत नाही," असं राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटलं आहे.

हेही वाचा :

  1. अक्षय शिंदेला दफन करण्यासाठी जागा शोधा; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश - Akshay Shinde Encounter
  2. अमित शाहांबरोबर बैठक जागा वाटपाची की 'दादां'च्या मनाधरणीची ? शेवटी ठरलेले उत्तर देत नेते परतले - Amit Shah Maharashtra Visit
  3. गेल्या दोन महिन्यात दोन लाख कोटींचे एमओयू साईन-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - EKNATH SHINDE NEWS

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.