ETV Bharat / state

देशाची नाही तर, शरद पवारांच्या पक्षाची परिस्थिती बिकट, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार - Sharad Pawar

Devendra Fadnavis : "देशाची नाही तर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिस्थिती बिकट आहे. योग्यवेळी परिवर्तन केलं असतं तर परिस्थिती बिकट झाली नसती," असा पलटवार करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2024, 6:15 PM IST

देवेंद्र फडणवीस

सातारा Devendra Fadnavis : नव्या चिन्हाच्या अनावरणप्रसंगी रायगडावर बोलताना देशाची परिस्थिती बिकट असून आता परिवर्तनाची गरज असल्याचे वक्तव्य खासदार शरद पवार यांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना "देशाची नाही तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिस्थिती बिकट आहे. योग्यवेळी परिवर्तन केलं असतं, तर परिस्थिती बिकट झाली नसती," असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज साताऱ्यात केला.

अजित पवारांना क्रेडिट द्यावंच लागेल : खासदार उदयनराजे भोसले यांचे अभिष्टचिंतन आणि माण तालुक्यातील गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजनेचा जल पूजन सोहळ्यासाठी सातारा दौऱ्यावर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. "चिन्हाच्या अनावरणासाठी खासदार शरद पवार यांना 40 वर्षानंतर रायगडावर जावं लागलं. याचं खरं क्रेडिट अजितदादांनाच द्यावं लागेल," असा खोचक टोला देखील त्यांनी मारला.

उदयनराजेंशी आपले संबंध भावासारखे : देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पहिल्यांदा आम्ही जागा वाटप करणार आहोत. भाजपामध्ये अगोदर वरिष्ठांकडून जागा वाटपाचा निर्णय घेतला जातो. त्यानंतर घोषणा केल्या जातात. कुठल्या जागा लढायच्या हे एकदा ठरलं की आम्ही ते जाहीर करू. खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत सांगायचं झालं तर आमचे संबंध भावासारखे आहेत आणि आमची मैत्री देखील आहे," असं त्यांनी सांगितले.

निवडणूक हरली की मशीनला दोष : ईव्हीएम मशीन संदर्भातील प्रश्नावर बोलताना फडणवीस यांनी इंडिया आघाडीला टोला लगावला. "ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवण्याचे निवडणूक आयोगानं ओपन चॅलेंज दिलं होतं. वास्तविक निवडणूक जिंकली की मशीन चांगले आहे. निवडणूक हरली तर, मशीनला दोष देणे योग्य नाही," असं फडणवीस म्हणाले. बच्चू कडू यांच्याबद्दल फडणवीस म्हणाले, "बच्चू कडू हे आमच्यासोबत महायुतीत आलेच नाहीत. ते शिवसेनेसोबत आहेत."

हे वाचलंत का :

  1. 'आंदोलन संपवण्यासाठी मला मारण्याचा प्रयत्न'; मनोज जरांगे यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप
  2. मुख्यमंत्री अमावस्या, पौर्णिमेला शेती करायला जातात; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
  3. शरद पवार यांचं नाव घेतल्याशिवाय 'यांची' हेडलाईन होत नाही; सुप्रिया सुळेंची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.