पुणे Namo Maharojgar Melava 2024 Baramati : गेल्या काही दिवसांपासून माध्यमातून नमो महारोजगार मेळाव्याची माहिती येत आहे. यामेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खूप मेहनत घेतली आहे. बारामतीसारख्या शहरात अतिशय सुंदर इमारती बांधल्या आहेत. तशा इमारती राज्यातील इतर पोलीस ठाण्याच्या बांधण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळं अजित पवार यांना पीएमसी देईन, मात्र गृहखातं देणार नाही, अशी फिरकी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत घेतली.
बसस्थानक, पोलीस मुख्यालयाची इमारत जोरदार : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून बारामतीत बसस्थानक आणि पोलीस मुख्यालयाची टोलेजंग इमारत बांधण्यात आली. या इमारतीच्या कामावर मी चाळीस पेक्षा जास्त वेळ येऊन पाहणी केली आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत पोलीस उपमुख्यालय आणि बसस्थानकाच्या अतिशय सुंदर इमारती बांधल्याची पावती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली.
पीएमसी देईन, मात्र गृहखातं देणार नाही : बारामतीच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देखरेखीत करण्यात आलेल्या बांधकामांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलंच कौतुक केलं. अजित पवार यांनी सुंदर इमारती बांधल्या आहेत. त्यामुळं "राज्यातील इतर पोलीस ठाण्याच्या इमारती अशाच प्रकारच्या बांधण्याचा मोह मला आवरत नाही. अजित पवार यांच्या देखरेखीत या इमारती बांधण्यात आल्यानं या इमारतींची पीएमसी मी अजित पवार यांनाच देईन. मात्र मला खात्री आहे की, पीएमसी दिल्यानंतर अजित पवार मला हळूच खातं मागतील, पण मी गृहखातं काही देणार नाही," अशी अजित पवार यांची फिरकी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचं भरभरुन कौतुक केलं.
बारामती बसस्थानक, पोलीस उपमुख्यालयाचं उद्घाटन : बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळी पोलीस उपमुख्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार शरद पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री उदय सामंत, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा :