ETV Bharat / state

पावभाजी विक्रेत्याला घातला सायबर गंडा, कर्जासाठी अ‍ॅपवर घेतली वैयक्तिक माहिती, नवीन कायद्यानुसार मुंबईत पहिला गुन्हा दाखल - Cyber Criminal Cheated Businessman - CYBER CRIMINAL CHEATED BUSINESSMAN

Criminal Cheated Businessman: कर्ज मिळविण्यासाठी फेसबुकवरुन फेक अ‍ॅपवर विचारलेली माहिती भरणे एका व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले. यामध्ये त्याची एका सायबर गुन्हेगाराकडून स्वत:ला वित्त संस्थेचा अधिकारी असल्याचं भासवून पाच लाख रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Cyber Criminal Cheated Businessman
फाईल फोटो (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 1, 2024, 4:20 PM IST

मुंबई Criminal Cheated Businessman : भारतीय न्याय संहितेचा मुंबईतील पहिला गुन्हा डी बी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हा पहिलाच सायबर फसवणुकीचा गुन्हा असून गिरगाव चौपाटीवर पावभाजी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाबरोबर वित्त संस्थेचा अधिकारी असल्याचं भासवून फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता ३१८ (४) आणि ३१९ (२) तसेच माहिती तंत्रज्ञानात कायदा ६६ (क) आणि ६६ (ड) अंतर्गत अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती डी बी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय घोरपडे यांनी दिली आहे.

विविध कलमान्वये गुन्हा दाखल : 1 जुलैला म्हणजेच आज मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास तक्रारदार दिलीप सुभेदार सिंह (वय 36 वर्ष) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार डी बी मार्ग पोलीस ठाण्यात मुंबईत पहिला भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार दिलीप सुभेदार सिंह (वय 36 वर्ष) हे मूळचे मध्य प्रदेश येथील असून गेल्या दहा वर्षांपासून मुंबईत कुटुंबासह राहत असून गिरगाव चौपाटी येथे खाऊ गल्ली येथे पावभाजी बनवण्याचं काम करतात.

अ‍ॅपवर माहिती भरली आणि अज्ञात इसमाचा आला कॉल : तक्रारदार दिलीप सुभेदार सिंह 25 जून रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास फेसबुक पाहत असताना त्यांना एक फेक चचसल सवंद या नावाचे फेसबुक पेज दिसले. सिंह यांना कर्जाची आवश्यकता असल्याने फेसबुक पेजवरील चचसल अ‍ॅपवरती क्लिक करून त्यामध्ये विचारण्यात आलेली माहिती सिंह यांनी भरली होती. या माहितीमध्ये नाव, मोबाईल क्रमांक आणि कर्जाची रक्कम इत्यादी माहिती भरण्यास सांगण्यात आली होती. त्यानंतर 26 जून रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास सिंह यांना त्यांच्या मोबाईलवरती एका कॉल आला आणि समोरील व्यक्तीने तो बजाज फिनसर्व्ह कंपनीतून बोलत असल्याचे सांगून तुम्ही काल रात्री कर्जासाठी अप्लाय केलं होतं, अशी विचारणा केली आणि त्यावरून अज्ञात इसमासोबत तक्रारदार सिंह यांचं बोलणं सुरू झालं.

पाच लाखांचे कर्ज मंजूर झाल्याचं आमिष अन् : समोरील व्यक्तीनं तक्रारदार दिलीप सुभेदार सिंह यांना सर्व कागदपत्रे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार समोरील व्यक्तीनं दिलेल्या दुसऱ्या मोबाईल क्रमांकावर तक्रारदार सिंह यांनी त्यांचे सर्व कागदपत्रे मोबाईलवर पाठवली. साधारण अर्ध्या तासातच अज्ञात व्यक्तीनं पुन्हा कॉल करून पाच लाखांचे कर्ज मंजूर झाले असून नोंदणी शुल्क 2550 रुपये भरावे लागतील, असं सांगितलं. त्यानुसार सिंह यांनी त्यांच्या भावाच्या बँक खात्यातून फोन पे द्वारे 2550 रुपये पाठवले. त्यानंतर पुन्हा अज्ञात इसमाने फोन करून जीएसटी रक्कम भरावी लागेल असं सांगून 9490 भरायला भाग पाडले. अज्ञात इसमाने पुन्हा कॉल करून तक्रारदार सिंह यांना वेगळ्या प्रकारचा चार्ज असल्याची बतावणी करून 9500 बारकोड पाठवून त्यावर पाठवण्यास सांगितले. सिंह यांनी मित्र अरुण सिंग यांच्या बँक खात्यातून फोन पेद्वारे ही रक्कम पाठवली. त्यानंतर सिंह यांच्या बँक खात्यात दोन दिवसात पाच लाख रुपये डिपॉझिट होतील, अशी माहिती मोबाईल वरून समोरील व्यक्तीनं दिली.

आणि फसवणूक झाल्याचं कळलं : 29 जून रोजी पुन्हा अज्ञात इसमाने तक्रारदार दिलीप सुभेदार सिंह यांना संपर्क करून पुन्हा अ‍ॅग्रिमेंट चार्जेसच्या नावाखाली 16,830 रुपये भरावे लागतील असं सांगून ते पैसे उकळले. तसेच वेगळ्या प्रकारचे चार्जेस सांगून 25 हजार 340 रुपये पाठवण्यास सांगितले. त्यावर 25,340 ही रक्कम सिंह यांनी दोन मित्रांच्या फोन पे द्वारे 12,670 इतकी रक्कम दोन वेळा पाठवली. पुन्हा अज्ञात इसमाच्या सांगण्यावरून सिंह यांनी 9 हजार 436 अज्ञात इसमाला पाठवले. त्यावर समोरील व्यक्तीने सिंह यांना 30 जून रोजी दुपारी चार वाजेपर्यंत त्यांच्या खात्यात पाच लाख रुपये डिपॉझिट होतील असं सांगितलं. अद्याप पर्यंत तक्रारदार सिंह यांच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा न झाल्यानं फोन कॉल आलेल्या मोबाईल क्रमांकावर विचारणा केली असता त्याने पुन्हा तीस हजार रुपये भरावे लागतील असं सांगितलं. त्यानंतर तक्रारदार यांची खात्री पटली की त्यांची फसवणूक झालेली आहे. याबाबत तक्रारदाराने मित्र अनिल सिंग याला घडलेला सायबर फसवणुकीचा प्रकार सांगितला. नंतर याबाबत डी बी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलीस उपनिरीक्षक विष्णुकांत कानवटे यांनी तक्रारदाराचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आहे.

नव्या कायद्यानुसार पहिला गुन्हा दाखल - गृहमंत्री : देशात आजपासून भारतीय न्यायदंड संहिता हा नवा कायदा लागू झाला आहे. आयपीसी ऐवजी या कायद्यानूसार आता कारवाई होणार असून यासंदर्भात पहिला गुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोंद झाल्याची माहिती गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. तर राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अभिनंदनाचा ठरावही यावेळी त्यांनी मांडला.

हेही वाचा :

  1. नीट परीक्षा पेपरफुटीतील लातूरमधील आरोपींचा आज सीबीआय घेणार ताबा, मोठे मासे गळाला लागणार का? - Latur NEEt Exam Scam
  2. "तुझ्याशिवाय हे शक्य झालं नसतं...", विश्वचषक जिंकल्यानंतर विराटची अनुष्का शर्मासाठी खास पोस्ट - Virat Kohli Instagram Post
  3. विधानपरिषदेच्या चार जागांचे आज निकाल लागणार, तीन मतदारसंघातील मतपत्रिकांची प्राथमिक मोजणी पूर्ण - Vidhan Parishad Election Result

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.