ETV Bharat / state

मोठी बातमी! छ. संभाजीनगरात किरकोळ कारणावरून दोन गटात राडा, 64 जणांवर गुन्हा दाखल - पडेगाव

Dispute Between Two Groups : छत्रपती संभाजीनगरमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. तसंच या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 64 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

chhatrapati sambhajinagar dispute between two groups case registered against 64 people
मोठी बातमी! छ. संभाजीनगरात किरकोळ कारणावरून दोन गटात राडा, 64 जणांवर गुन्हा दाखल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 23, 2024, 1:13 PM IST

Updated : Jan 23, 2024, 1:53 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Dispute Between Two Groups : छत्रपती संभाजीनगरमधील पडेगाव येथे सोमवारी (22 जानेवारी) दुपारी पतंग आणण्यावरून झालेल्या वादात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. यावेळी पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. याप्रकरणी 64 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयीत असलेल्या 50 जणांना कोंबिंग ऑपरेशन करून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

वादाचं कारण काय : सोमवारी (22 जानेवारी) एका अकरा वर्षीय मुलाला मारहाण केल्यानं हा वाद सुरू झाला. मिळालेल्या माहितीनुसार हा मुलगा कटलेला पतंग आणण्यासाठी गेला असता काहीजणांनी त्याला बेदम मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी मुलाची आई आणि आजी गेली असता, त्यांना देखील मारहाण करण्यात आली. हा वाद वाढत गेला आणि पडेगाव परिसरातील कादंबरी दर्गा परिसरात दोन गटांमध्ये मारामारी सुरू झाली. जवळपास एक तास दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

या घटनेचा आधार घेऊन काही समाजकंटक शहरात अफवा पसरण्याच्या प्रयत्नात असून त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये - नितीन बगाटे , पोलीस उपायुक्त

पोलिसांची कारवाई : सदरील घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळ गाठून जमावाला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही गट ऐकत नसल्याने अखेर पोलिसांनी सहा अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडल्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी सोमवारी रात्री जवळपास 64 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत सुमारे 50 जणांना ताब्यात घेतलं आहे. तसंच या दोन्ही गटांमध्ये यापूर्वीही वाद आणि मारामारी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा -

  1. थराराक! ब्रेक निकामी झालेल्या ट्रकनं बारा वाहनांना उडवलं
  2. उच्चभ्रूवस्तीत सुरू असलेला कुंटणखाना उद्ध्वस्त
  3. नायलॉन मांजा विक्रेत्यांच्या दुकानावर फिरणार 'बुलडोझर'

Last Updated : Jan 23, 2024, 1:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.