ETV Bharat / state

"साहेब सावध राहा, नाहीतर हे गुंड तुम्हाला...", छगन भुजबळांना निनावी पत्राद्वारे इशारा - छगन भुजबळ धमकी

Chhagan Bhujbal : ओबीसी नेते छगन भुजबळ यांना एका निनावी पत्राद्वारे सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. त्यांच्या नाशिकच्या कार्यालयाला हे पत्र प्राप्त झालं. काय आहे या पत्रात, जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी...

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2024, 8:02 AM IST

नाशिक Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते छगन भुजबळ सध्या नाराज आहेत. आरक्षणाविरोधात ते जाहीरपणे आपली भूमिका मांडतायेत. यासाठी त्यांनी राज्याच्या मंत्रीमंडळातून राजीनामा देखील दिला होता. या पार्श्वभूमीवर आता त्यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची माहिती देणारं पत्र मिळालंय. छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील कार्यालयाला हे निनावी पत्र मिळालं. या पत्राद्वारे त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. पत्र लिहिणाऱ्यानं स्वत:ला भुजबळांचा हितचिंतक म्हटलंय.

पत्रात काय म्हटलंय : हातानं लिहिलेल्या या पत्रात म्हटलं आहे की, "साहेब (छगन भुजबळ), तुम्हाला उडवण्याची सुपारी 5 लोकांनी घेतली आहे. ते गंगापूर-दिंडोरी-चांदशी इथं हॉटेलमध्ये थांबले आहेत. तुम्हाला उडवण्याची 50 लाखांची सुपारी घेण्यात आली आहे. साहेब सावध राहा. हे पाच गुंड तुमचा रात्रभर शोध घेत फिरतायेत. सागर हॉटेलसमोर त्यांची मिटिंग झाली." छगन भुजबळांना मिळालेल्या या पत्रानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. स्थानिक पोलीस या पत्राची चौकशी करत आहेत.

मराठा आरक्षणाविरोधात भूमिका : येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, भुजबळ यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विधानसभेत दावा केला होता की, त्यांना गोळ्या घालून ठार केलं जाऊ शकते. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान दोन महिन्यांपासून शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. राज्य सरकारनं मराठ्यांना आरक्षण द्यावं, मात्र हे आरक्षण ओबीसी कोट्यातून नसावं. मराठ्यांना स्वतंत्र कोट्यातून आरक्षण मिळावं, अशी छगन भुजबळांची भूमिका आहे.

हे वाचलंत का :

  1. मराठा ओबीसी वाद : मंत्री छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून तत्काळ काढून टाका, संजय राऊतांचा हल्लाबोल
  2. मी 16 नोव्हेंबरलाच राजीनामा दिला आणि अंबडच्या सभेला गेलो - छगन भुजबळ यांचा मोठा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.