ETV Bharat / state

पुणे हिट अँड रन प्रकरण, अल्पवयीन मुलाचा 'तो' व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल - Car Accident Case Pune - CAR ACCIDENT CASE PUNE

Car Accident Case Pune : पुण्यातील कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणात त्या अल्पवयीन मुलाचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केल्या प्रकरणी सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Hit And Run Case Pune) या घटनेत व्हिडिओ बनवणारा आणि तो व्हायरल करणाऱ्या यूझर आयडी धारकांच्या विरोधात गुन्हा नोंदविला गेला आहे.

Car Accident Case Pune
पुणे कार अपघात (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 25, 2024, 5:35 PM IST

पुणे Car Accident Case Pune : पुण्यातील कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणात त्या अल्पवयीन मुलाला दाखवून त्याचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. यानंतर व्हायरल करण्यात आलेला तो व्हिडिओ त्या अल्पवयीन मुलाचा नसल्याचं समोर आलं आहे. (Minor Boy Video Viral) या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी तो व्हिडिओ बनवणारा आणि व्हायरल करणाऱ्या यूझर आयडी धारकांच्या विरोधात पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलाच्या आईने दिली तक्रार : या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तो व्हायरल व्हिडिओ बनवणारा तसेच व्हायरल करणारा जो आयडी आहे, त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी कल्याणी नगर येथील 'हिट अँड रन' प्रकरणातील त्या अल्पवयीन मुलाच्या नावाचं एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला होता. ज्यात तो अश्लील भाषेत शिवीगाळ करत असल्याचं समोर आलं होतं. या व्हिडिओ नंतर अल्पवयीन मुलाच्या आईने देखील समोर येत तो व्हिडिओ माझ्या मुलाचा नसल्याचं सांगितलं होतं. आता या प्रकरणात पुणे पोलिसांनी व्हिडिओ बनवणारा तसेच सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्याच्या विरोधात सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

अग्रवाल कुटुंबाने ड्रायव्हरला धमकावले : पुण्यातील कल्याणी नगर येथील 'हिट अँड रन' प्रकरणात त्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी अपघातावेळी त्या अल्पवयीन मुलाबरोबर गाडीत शेजारी बसलेल्या ड्रायव्हरला तू या अपघाताची जबाबदारी घे. तुला बक्षीस देऊ, असं आमिष दाखवलं आणि नंतर त्याला एक दिवस कोंडून धमकवण्यात आलं असल्याचं, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं. या प्रकरणात आज पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल करत या अल्पवयीन मुलाच्या आजोबाला अटक केली आहे. तर त्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर भादंवि कलम 365, 368 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात चालक गंगाधर पुजारी यांनी तक्रार दिली आहे.

गाडीचा चालक बदलण्याचा प्रयत्न : याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, रविवारी मध्यरात्री जेव्हा घटना घडली तेव्हा तो अल्पवयीन मुलगा गाडी चालवत होता आणि ड्रायव्हर शेजारी बसला होता. मागे त्या अल्पवयीन मुलाचे दोन मित्रही बसले होते. अपघात झाल्यावर त्यांना जेव्हा येरवडा पोलीस ठाण्यात घेऊन जात होते तेव्हा त्या ड्रायव्हरला वडील आणि आजोबा यांच्याकडून फोन करण्यात आला आणि तू गाडी चालवत होता असं पोलिसांना सांग. जर तू हे प्रकरण स्वत:च्या अंगावर घेतलं तर तुला पाहिजे ते बक्षीस देण्यात येईल, असं सांगण्यात आलं. नंतर पोलीस स्टेशन येथे जाऊन त्याच्यावर दबाव टाकण्यात आला आणि ड्रायव्हर गाडी चालवत असल्याचा जबाब पोलिसांना देण्यात आला. घटनेनंतर त्या ड्रायव्हरला अग्रवाल कुटुंबीयांकडून घरी घेऊन जाऊन त्याचा मोबाईल जप्त करून त्याला एक दिवस कोंडून ठेवण्यात आलं होत. दुसऱ्या दिवशी त्या ड्रायव्हरची बायको आल्यावर तिने आरडा ओरडा केल्याने त्यांना सोडण्यात आलं. एकूणच गाडीचा चालक बदलण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती तपासात समोर आली आहे, असं पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितलं होतं.

हेही वाचा :

  1. पुणे हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल - Pune Hit And Run Case
  2. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात 'मनुस्मृती'चा समावेश केल्यानं 'मनुचे राज्य' येणार का? राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू - Manusmriti Controversy
  3. सावधान! बाजारात चक्क बनावट मसाले विक्री... लाखांचा माल जप्त - Bhiwandi Crime

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.