ETV Bharat / state

ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्निल कुसाळेची पुण्यात विजयी मिरवणूक; चंद्रकांत पाटलांनी केलं कौतुक - Swapnil Kusale

Swapnil Kusale News : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवून स्वप्निल कुसाळे आज (8 ऑगस्ट) पुण्यात परतला. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते स्वप्निलचा सत्कार करण्यात आला.

shooter Swapnil Kusale felicitated by Chandrakant Patil In Pune
स्वप्निल कुसाळे पुणे मिरवणूक (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 8, 2024, 10:00 PM IST

पुणे Swapnil Kusale News : ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसाळे याचं मायदेशी आगमन झाल्यानंतर आज (8 ऑगस्ट) पुण्यात त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. तसंच यावेळी त्याचा जाहीर सत्कारही करण्यात आला. महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल या ठिकाणी स्वप्निल कुसाळेची ओपन जीपमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर स्टेडीयममध्ये झालेल्या कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर क्रीडा आयुक्त डॉ राजेश देशमुख, स्वप्निलच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे, स्वप्निलचे आई-वडील आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वप्निल कुसाळेची पुण्यात विजयी मिरवणूक आणि सत्कार (ETV Bharat Reporter)

चंद्रकांत पाटलांनी केलं स्वप्निलचं कौतुक : यावेळी बोलत असताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वप्निलचं तोंडभरुन कौतुक केलं. ते म्हणाले की, "आज सगळेजण आमच्या भाषण ऐकायला नाही, तर स्वप्निलला बघायला आणि भेटायला आलेत. माझ्या कोल्हापूर जवळच्या गावात राहणारं हे कुटुंब आहे. 'कांबळवाडी' या गावाला देखील सर्वात चांगलं गाव असा पुरस्कार मिळालाय. त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील एक नागरिक आणि महाराष्ट्रातील मंत्री अशा सर्व भूमिकेतून मी स्वप्निलचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी आज इथं उभा आहे."

"1952 नंतर थेट 2024 ला स्वप्निलच्या रूपानं महाराष्ट्राचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपलाय. स्वप्निलच्या या यशात त्याच्या आई-वडिलांचा तसंच त्याच्या गुरु दिपाली देशपांडे यांचाही मोलाचा वाटा आहे. गगन नारंग अंजली भागवत, सुमाताई शिरुर, दिपाली देशपांडे या चौघांनी भारतीय आणि महाराष्ट्रातील नेमबाजीला योग्य दिशा दिलीय, असं म्हणायला हरकत नाही. खेळाडूंसाठी राज्य शासन देखील तत्पर असून वेळोवेळी मदतीसाठी तयार आहे. याची खात्री बाळगा", असंही पाटील म्हणाले .

पुढं ते म्हणाले की, "आपल्या मुलाच्या बाबतीत आई-वडिलांनी खस्ता खाणं म्हणजे काय? आणि त्या खस्ता खाल्ल्यानंतरचं यश काय? हे स्वप्निलच्या आई-वडिलांकडं पाहून समजतं. आज संपूर्ण गावाला आनंद झाला. पण गावालाही काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून मी स्वप्निलच्या वडिलांना विचारलं की, गावाला काय पाहिजे सांगा? तर गावाला आमचं एक मंदिर आहे ते नीट करून हवय आणि गावामध्ये एक व्यायाम शाळा बांधून हवी आहे, असं त्यांनी सांगितलं. तर या दोन्ही गोष्टींचं काम उद्यापासून सुरू होईल", अशी घोषणाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली.

हेही वाचा -

  1. 'बाप्पा'मुळंच सगळं शक्य झालं; ऑलिम्पिकपदक विजेता स्वप्निल कुसाळे 'दगडुशेठ' चरणी लीन - Swapnil Kusale
  2. "स्वप्निलच्या यशानंतर राज्य सरकार 'मिशन लक्ष्यवेध'ला देणार बळ"- क्रीडामंत्री संजय बनसोड - Sanjay Bansode On Paris Olympics
  3. स्वप्निल कुसाळे आता 'ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी' ; ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताच मध्य रेल्वेनं दिली पदोन्नती - Paris Olympics 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.