ETV Bharat / state

पुणे हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपीची अखेर बालसुधारगृहातून सुटका, मुंबई हायकोर्टाने दिले होते आदेश - Pune Porsche Accident Case - PUNE PORSCHE ACCIDENT CASE

Pune Porsche Accident Case : पुण्यातल्या कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय. पुणे येथील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला सुधारगृहातून मुक्त करण्याचे मुंबई उच्च न्यायालयानं आदेश दिले आहेत. अल्पवयीन आरोपीच्या आत्याने मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) याचिका दाखल केली होती.

Pune Porsche Accident Case
पुणे हिट अँड रन प्रकरण (Source ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 3:21 PM IST

Updated : Jun 25, 2024, 8:50 PM IST

पुणे Pune Porsche Accident Case : पुणे हिट अँड रन प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. पुण्याच्या कल्याणी नगर येथील अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुंबई हायकोर्टानं सुधारगृहातून सोडण्याचा आदेश दिला आहे. पुण्यातील कल्याणीनगर भागात या तरुणाने पोर्शे कारने दोन युगुलाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली होती. या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय. याप्रकरणी आरोपीसह त्याचा बचाव करणाऱ्या अन्य व्यक्तींना पोलिसांनी अटक केली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने दिले आदेश : पुणे येथील पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला तत्काळ मुक्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. खंडपीठासमोर या प्रकरणाच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली होती. त्यावेळी निकाल राखून ठेवण्यात आला होता. मंगळवारी न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी निकालातील ऑपरेटिव पार्ट वाचून दाखवला.

तिन्ही निर्णय चुकीचे : याप्रकरणी आरोपीची आत्या पूजा जैन यांच्यातर्फे याचिका दाखल करणारे वकील प्रशांत पाटील म्हणाले की, अल्पवयीन मुलाविरोधात बेकायदा ताब्यात घेण्याची कारवाई ज्युवेनाईल कायद्याप्रमाणे चुकीची होती. 19 मे ला आरोपीला जामिन मिळाला होता. मात्र नंतर त्याला 22 मे ला कस्टडीत घेण्यात आलं. तसंच 5 जून आणि 12 जूनला त्याची कस्टडी वाढवण्यात आली. हे तिन्ही निर्णय चुकीचे आणि बेकायदा असल्याचा आमचा दावा होता आणि न्यायालयाने तो मान्य केला. न्यायालयानं अल्पवयीन आरोपीची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

तरुण-तरुणीचा मृत्यू : हा अपघात गंभीर असला तरी, बाल गुन्हेगारी कायद्याच्या तरतुदींचं पालन करणं कायद्यानं बंधनकारक आहे. त्याचा जामिन मंजूर केल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन निरीक्षण गृहात पाठवण्याची कृती बेकायदा तसंच कार्यक्षेत्राबाहेरील असल्याचं मत खंडपीठानं व्यक्त केलं. याप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आत्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पुण्यातील ड्रिंक अँड ड्राईव्ह अपघात प्रकरणात सदर अल्पवयीन आरोपीनं आपल्या वडिलांच्या कोट्यवधी रुपयांच्या चारचाकी वाहनाने मध्यरात्री दुचाकीला धडक दिली होती. त्यामध्ये तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता.

कुटुंबीयांना मानसिक धक्का : पुण्यातील कल्याणी नगर भागात 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीने त्याच्या ताब्यातील महागड्या गाडीनं दुचाकीला धडक दिल्यानं ज्या दोघांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना अत्यंत मोठा मानसिक धक्का बसला आहे. मात्र त्या अल्पवयीन तरुणाला देखील या कृत्यांमुळं मोठा मानसिक धक्का बसला आहे. या घटनेचा त्याच्या मनावर परिणाम होणं साहजिक आहे, असं मत न्यायालयानं यावेळी व्यक्त केलं होतं.

तरुणाची बालसुधारगृहातून झाली सुटका : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेला तरुण अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांनी सोमवारी (24 जून) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या दोन्ही कुटुंबाचं सांत्वन केलं होतं. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी संबंधित घटनेचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आज हायकोर्टानं अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचा -

पुणे कार अपघात प्रकरण; बदललेले 'ते' रक्ताचे नमुने आरोपीच्या आईचे - Pune Porsche Accident Case

मुलाचा 'कार'नामा! वडील, आजोबा अन् आता आई अटकेत; विशाल अग्रवालचा पोलीस पुन्हा घेणार ताबा - Pune Porsche accident case

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण ; अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह आजोबाला कोठडी, जाणून घ्या काय आहे अपघाताची ए टू झेड कहाणी - Pune Porsche Accident Case

Last Updated : Jun 25, 2024, 8:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.