ETV Bharat / state

अखेर सहा दिवसांनी अक्षय शिंदेचा मृतदेह दफन; स्थानिकांनी केला विरोध - Akshay Shinde Body Buried

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Updated : 14 minutes ago

Akshay Shinde Body Buried : अखेर 6 दिवसांनी अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) मृतदेह दफन करण्यात आला. उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत हा मृतदेह दफन करण्यात आला. यासाठी स्थानिक शिवसेना शिंदे गटाचा विरोध होता. मात्र, पोलीस बंदोबस्तात दफनविधी पार पडला.

Akshay shinde
बदलापूर अत्याचार प्रकरण आरोपी अक्षय शिंदे (File Photo)

ठाणे Akshay Shinde Body Buried : बदलापूर अत्याचार प्रकरणातील (Badlapur Rape Case) आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूला सहा दिवस झाले होते. तरीही त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले नव्हते. अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) अंत्यविधी सोमवारपर्यंत करण्याची ग्वाही राज्य सरकारनं हायकोर्टात दिली होती. त्यामुळं अंत्यविधी करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. उल्हासनगर येथे अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यास स्थानिकांनी विरोध केला. त्यामुळं मोठ्या पोलीस बंदोबस्तात उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत रविवारी अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यात आला.

अंत्यविधीसाठी स्थानिकांनी केला विरोध : अक्षय शिंदेचा अंत्यविधी बदलापूरमध्ये करण्यास स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी विरोध दर्शवला. त्यानंतर, अक्षयच्या कुटुंबीयांनी अंबरनाथच्या स्मशानभूमीतील जागेची पाहणी केली होती. मात्र, अंबरनाथमध्ये देखील मनसे आणि शिवसेनेने त्याचा अंत्यविधी करण्यास विरोध दर्शवला. त्यानंतर, उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी खड्डा खोदण्यात आला. मात्र, येथेही स्थानिकांकडून विरोध करण्यात आला. अक्षय शिंदेच्या दफन विधीसाठी खोदलेला खड्डा येथील कार्यकर्त्यांनी बुजवला होता, त्यानंतर, पोलीस बंदोबस्तात पुन्हा हा खड्डा खोदण्यात आला.

स्थानिकांनी स्मशानात अक्षय शिंदेच्या अंत्यविधीला केला विरोध (ETV Bharat Reporter)

अक्षयच्या मृतदेहाचे दफन : दरम्यान, पोलीस आणि रुग्णालय प्रशासनानं रविवारी अक्षयच्या आई-वडिलांना त्याचा मृतदेह ताब्यात दिला. मृतदेह ताब्यात घेऊन शववाहिका उल्हासनगर दिशेनं निघाली. उल्हानगरमध्ये कडक पोलीस बंदोबस्तात अक्षयच्या मृतदेहाचे दफन करण्यात आले. मात्र, येथेही स्थानिकांनी स्मशानात धाव घेत अंत्यविधीला विरोध केला.

पोलिसांकडून सुरू होता जागेचा शोध : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी, अक्षयच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळं, अक्षयच्या मृतदेहावरील अंत्यसंस्कार हा गुंतागुंतीचा विषय बनला होता. शिंदे कुटुंबीयांच्या रितीरिवाजानुसार अक्षयचा दफनविधी करण्यास सरकारच्यावतीनं कबुली दर्शवण्यात आली होती. त्यामुळं, गेल्या 3 दिवसांपासून दफनविधीसाठी जागा शोधण्याचं काम पोलिसांकडून सुरू होतं, अखेर हा शोध संपला आहे.

हेही वाचा -

अक्षय शिंदेला दफन करण्यासाठी जागा शोधा; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश - Akshay Shinde Encounter Case

बलात्काराच्या आरोपात भाजपाच्या पदाधिकाऱ्याला अटक; देवेंद्र फडणवीस एन्काऊंटर करणार का ? संजय राऊतांचा 'रोखठोक' सवाल - Sanjay Raut On Akshay Shinde

शिंदेनं झाडलेल्या इतर दोन गोळ्या गेल्या कुठे? न्यायालयाचा सवाल; पोलीसही येणार आरोपीच्या पिंजऱ्यात? - Akshay Shinde Encounter Case

Last Updated : 14 minutes ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.