ETV Bharat / state

मुंबई महापालिकेतील 1400 रिक्त जागांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार-अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त - बृहन्मुंबई महानगरपालिका

strengthening the security forces : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बळकटीकरण करण्याचं उद्दिष्ट बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं ठेवलं आहे. महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाचा 58 वा वर्धापन दिन आज शुक्रवार (दि. 1 मार्च)रोजी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भांडूप संकूल येथे सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्रात पार पडला. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त शिंदे बोलत होते.

सुरक्षा दलाचा 58 वा वर्धापन दिन
सुरक्षा दलाचा 58 वा वर्धापन दिन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 1, 2024, 10:51 PM IST

मुंबई : strengthening the security forces : संपूर्ण मुंबईत पालिकेच्या आस्थापनांना सेवा देणाऱ्या सुरक्षा दलाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बळकटीकरण करण्याचं उद्दिष्ट बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं ठेवलं आहे. सोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अत्याधुनिक व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून अधिकाधिक उत्तम सेवा देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे, असं अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी म्हटलं आहे. सुरक्षा दल अधिक अद्ययावत आणि बळकट करण्याचा तसंच मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ करण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचंही डॉ. शिंदे यांनी सांगितलं आहे.

चोरीची प्रकरणे कमी झाली : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलाचा 58 वा वर्धापन दिन आज अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भांडूप संकूल येथे सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्रात पार पडला. यावेळी आयुक्त शिंदे म्हणाले की, पालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय, के. ई. एम, सायन हस्पिटल, नायर धर्मार्थ रुग्णालय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि कुपर रुग्णालय या चार प्रमुख रूग्णालयात सीसीटीव्ही कॅमेर्‍यांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला आहे. रूग्णालयाच्या परिसरात येणाऱ्या वाहनांसाठी तसंच रूग्णांसाठी या कॅमेरा वापराचा परिणाम म्हणजे रूग्णालयातील नातेवाईकांचं साहित्य आणि मोबाईलच्या चोरीची प्रकरणे कमी झाली आहेत. रूग्णालयाच्या परिसरातील जमाव, आग यासारख्या दुर्घटनांची माहिती नियंत्रण कक्षालाही या कॅमेऱ्याच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची सुविधा आहे.

व्हिडिओ शूट करण्याची सुविधा : महानगरपालिकेच्या सहायक सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा रक्षक या पदाची भरतीची प्रक्रिया महत्वाच्या टप्प्यावर आहे. सहायक सुरक्षा अधिकारी 65 पदे आणि सुरक्षा अधिकारी 1400 पदे आदी रिक्त जागांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. प्रत्येक सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये ई बटवडा या मोबाईल ॲपचा वापर येत्या पंधरवड्यात सुरू होणार आहे. तसंच या मोबाईल ॲपचा वापर प्रत्येक सुरक्षा रक्षकाला आपल्या कामाचे ठिकाण कळण्यासाठी तसेच उपस्थिती लावण्यासाठी होणार आहे. या एप्लिकेशनमध्ये जिओ फेन्सिंगचा वापर करण्यात आला आहे. त्यासोबतच एखादा मोर्चा किंवा जमाव याबाबतची माहिती देण्यासाठी ॲपचा वापर करता येईल. आपत्कालीन प्रसंगी लाईव्ह करण्याची तसंच व्हिडिओ शूट करण्याची सुविधादेखील या ॲपमध्ये देण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त सुधाकर शिंदे यांनी दिली आहे.

हेही वाचा :

1 धक्कादायक! सुसाईड नोट लिहून रेल्वे होमगार्डची आत्महत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

2 पाच दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं, सभागृहाचा 31 मिनिटं वेळ गेला वाया

3 पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई! दोन कोटीचं 'मेफेड्रोन ड्रग्स' केलं जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.