ETV Bharat / state

अनंत अंबानींना योगी यांच्याकडून मिळालेल्या फ्रेमचं काय वैशिष्ट्य आहे? हजारो वर्षांच्या परंपरेशी संबंध - MAHAKUMBH 2025

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची शनिवारी भेट घेतली. या भेटीत अंबानी यांना योगी यांच्याकडून खास भेट मिळाली.

Anant Ambani UP CM Visit
अनंत अंबानी योगी आदित्यनाथ भेट (Source: courtesy X @myogiadityanath))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

Updated : 2 hours ago

मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजचे नॉन एक्झ्युटिव्ह डायरेक्टर अनंत अंबानी यांनी मुंबईत आलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अंबानींना एक फ्रेम भेट दिली.

'वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम'ला (WHEF) संबोधित करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ शनिवारी मुंबईत पोहोचले. वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचे आयोजन रिलायन्सची मालकी असलेल्या बीकेसीमध्ये जीओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 15 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. अनंतर अंबानी यांनी योगी आदित्यनाथ यांना भेटीदरम्यान शाल भेट दिली. यावेळी आदित्यनाथ यांनी अंबानींना एक खास फ्रेम भेट दिली. या फ्रेमचं वैशिष्ट्य म्हणजे प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभचा लोगो यामध्ये आहे.

महाकुंभ मेळाव्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. या महाकुंभ मेळाव्यासाठी साधु, महाराज, भाविकांसह करोडो लोक येणार आहेत. तसेच हा महाकुंभ मेळाव्यासाठी विदेशातूनदेखील पर्यटक येणार आहेत. या महाकुंभचे वैशिष्ट्ये आणि सविस्तर माहिती जाणून घेऊ.

महाकुंभाचं कसे होते आयोजन- प्रत्येक 12 वर्षात दोन अर्धकुंभ (अर्धकुंभ) होतात. हे दर 6-6 वर्षांनी घडते. एक महाकुंभ आणि दुसऱ्या महाकुंभामध्ये चार कुंभ असतात. कुंभमेळा, अर्दा कुंभमेळा आणि महाकुंभ हे भारतातील 4 नद्यांच्या (शहरांच्या) काठावर आयोजित केले जातात. रोटेशननुसार, देशातील नदी किनारी असलेल्या चार शहरात महाकुंभाचे आयोजन केले जाते. जेव्हा सूर्य मेष राशीत आणि गुरु ग्रह कुंभ राशीत असतो, तेव्हा दर 12 वर्षांनी महाकुंभमेळ्याचे आयोजन केलं जाते. यावेळी संगम तीरावर मोठी गर्दी जमते. प्रयागराज (अलाहाबाद) येथे 13 जानेवारीपासून महाकुंभ 2025 सुरू होणार आहे. या महाकुंभ मेळाव्याची सांगता 26 फेब्रुवारी होणार आहे.

या ठिकाणी होतो महाकुंभ

1. गंगेच्या काठावर हरिद्वार (उत्तराखंड)

2. शिप्राच्या काठावर उज्जैन (मध्य प्रदेश)

3. गोदावरीच्या काठी नाशिक (महाराष्ट्र)

4. गंगा, यमुना आणि पुराणातील उल्लेखानुसार अदृश्य सरस्वती नदी यांच्या संगमावर, प्रयागराज (उत्तर प्रदेश)

काय आहे पौराणिक कथा- महंत यमुना पुरी यांनी सांगितले, " समुद्रमंथनाच्या वेळी अमृताचे भांडे समुद्रातून बाहेर आले. तेव्हा ते अमृत मिळविण्यासाठी देव आणि दानवांमध्ये घनघोर युद्ध झाले. युद्धात इंद्राचा मुलगा जयंत अमृतपात्र घेऊन पळून गेलानंतर त्याला पकडण्यासाठी राक्षस त्याच्या मागे धावू लागले. यावेळी झालेल्या संघर्षात कलशातून अमृताचे थेंब सांडून पृथ्वीवर 12 ठिकाणी पडले. यामध्ये प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैनचा या ठिकाणांचा समावेश आहे. अमृताचे थेंब कुंभातून पडले, त्याच ठिकाणी शतकानुशतके कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं". ज्योतिषशास्त्रीय गणिते आणि ग्रह नक्षत्रांच्या अद्भुत संयोजनामुळे दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केलं जात असल्याच महंत यमुना पुरी यांनी सांगितलं.

12 वर्षांनंतर कशामुळे होतो महाकुंभ?- ग्रह नक्षत्रम ज्योतिष संस्थेचे ज्योतिषी आशुतोष वार्ष्णेय यांनी सांगितले, " देव आणि दानवांमध्ये 12 वर्षे अमृतासाठी संघर्ष सुरू राहीला. माणसांची 12 वर्षे देवाच्या एका दिवसाप्रमाणं असतात. या कारणास्तव दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. तसेच देवगुरू बृहस्पति दर 12 वर्षांनी वृषभ राशीत प्रवेश करतो. याच कारणास्तव प्रयागराजमध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. देवगुरु गुरु वृश्चिक राशीत प्रवेश करतो तेव्हा अर्ध कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. ज्योतिषी आशुतोष वार्ष्णेय यांच्या मते, कुंभ कलश तुटण्यापासून वाचवण्याची सूर्यदेवतेची जबाबदारी होती. यामुळेच ग्रह आणि नक्षत्र एकाच पद्धतीने एकत्र आल्यानंतर महाकुंभ घेतला जातो".

महाकुंभामध्ये 5 मुख्य स्नान उत्सव: महंत यमुना पुरी यांनी सांगितले, " 13 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळ्यात पाच स्नान उत्सव असणार आहेत. मकर संक्रांती, मौनी अमावस्या आणि वसंत पंचमी या दिवशी नदी संगमावर करोडो भाविक जमणार आहेत. या वेळी पौष पौर्णिमेचा पहिला स्नानोत्सव १३ जानेवारीला आहे. तर 14 जानेवारीला मकर संक्रांत हे पहिले शाही स्नान असणार आहे. मौनी अमावस्येचा दुसरा आणि सर्वात मोठा स्नान उत्सव 29 जानेवारीला होणार आहे. 3 फेब्रुवारीला वसंत पंचमी हा शेवटच्या शाही स्नानाचा सण असेल. तर 12 फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमेच्या स्नानाने महाकुंभाच्या कल्पवासाची सांगता होणार आहे. 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीपर्यंत महाकुंभाचा उत्सव सुरू राहणार आहे".

हेही वाचा-

Last Updated : 2 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.