ETV Bharat / state

कर्नाटकात जाण्यासाठी आनंद तेलतुंबडेंना विशेष न्यायालयाची परवानगी; 'या' अटींचं करावं लागणार पालन - बसव राष्ट्रीय पुरस्कार

Anand Teltumbde : कर्नाटक सरकारनं 2023-24 चा बसवं राष्ट्रीय पुरस्कार प्रख्यात लेखक आनंद तेलतुंबडे यांना जाहीर केलाय. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी त्यांना कर्नाटकात जाण्यासाठी विशेष न्यायालयानं दोन दिवसांची परवानगी दिलीय.

आनंद तेलतुंबडे
आनंद तेलतुंबडे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 31, 2024, 10:20 AM IST

मुंबई Anand Teltumbde : भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणात आरोपी असलेले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नात जावई असलेले लेखक आनंद तेलतुंबडे यांना मुंबई विशेष न्यायालयानं दोन दिवस कर्नाटकात जाण्यासाठी परवानगी दिलीय. कर्नाटक राज्य सरकार त्यांना 2023-24 चा "बसवं राष्ट्रीय पुरस्कार" प्रदान करणार आहे. त्यासाठी त्यांना दोन दिवस कर्नाटकात जाण्याची परवानगी मुंबई एनआयए संस्थेच्या विशेष न्यायालयानं दिलीय.

अटी शर्थींच्या आधारे परवानगी : भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणात एकूण 16 आरोपीपैकी डॉ. आनंद तेलतुंबडे हे एक आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्यायालयानं आनंद तेलतुंबडे यांना कर्नाटक राज्यातील बंगळूर इथं पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाण्यास परवानगी दिलीय. मात्र काही अटी आणि शर्तींच्या आधारे त्यांना ही परवानगी दिलीय. प्रवासाचं नियोजन कोर्टाला कळवावं, असंही न्यायालयानं सांगितलंय.

आज मिळणार पुरस्कार : कर्नाटक सरकारतर्फे दरवर्षी सामाजिक न्याय, साहित्य आणि सामाजिक सदभावासाठी काम करणाऱ्यांना 'बसव राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचं स्वरुप 10 लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह असं असतं. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (माओवादी) केंद्रीय समिती सदस्य मिलिंद तेलतुंबडे यांचे आनंद तेलतुंबडे हे मोठे बंधू आहेत. त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये महत्वाची पदं भूषविली आहेत. तसंच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद इथंही त्यांनी संशोधन कार्य केलंय. आनंद तेलतुंबडे यांना बंगळुरुतील रवींद्र कलाक्षेत्र इथं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

कोणत्या प्रकरणात झाली अटक : पुण्यामध्ये 31 डिसेंबर 2017 रोजी पार पडलेल्या एल्गार परिषदेनंतर 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव इथं हिंसाचार घडला होता. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला होता तर अनेकजण जखमी झाले होते. त्यांनतर राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. याप्रकरणी एप्रिल 2020 मध्ये एनआयएनं आनंद तेलतुंबडे यांना अटक केली होती. तेव्हापासून ते नवी मुंबईतील तळोजा कारागृहात होते.

हेही वाचा :

  1. Elgar Parishad Case : एल्गार परिषद प्रकरणातील आरोपींना अद्याप दिलासा नाही
  2. Anand Teltumbde : भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडे यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.