ETV Bharat / state

पोलीस भरती तळोजा ग्राउंडवर धावताना एका तरुणाचा मृत्यू - police recruitment - POLICE RECRUITMENT

नवी मुंबईत पोलीस भरतीदरम्यान तळोजा ग्राउंडवर धावताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घडना घडली आहे. तसंच पोलीस भरतीदरम्यान आणखी सहा जणांची प्रकृती बिघडल्याचं समोर येत आहे.

Akshay Birhade
अक्षय बिऱ्हाडे (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 29, 2024, 10:05 PM IST

ठाणे : राज्याच्या विविध भागात पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हजारो तरुण या भरती प्रकियेत सहभागी झाले आहेत. मात्र, राज्यातील पोलीस भरतीला अस्वस्थ करणारी घटना घडलीय. नवी मुंबईत शनिवारी (29 जून) एक तरुणाचा धावताना मृत्यू झाला आहे. नवी मुंबईतील बलेगाव कॅम्पमध्ये भरती प्रक्रियेदरम्यान ही घटना घडली आहे.

आणखी सहा जणांची प्रकृती बिघडली : पोलीस भरतीदरम्यान आणखी सहा जणांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. या सर्वांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सहा जणांची प्रकृती खालावली होती, त्यापैकी एक बरा झाला असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. एक जण गंभीर असल्याची माहिती ठाणे महापालिकेनं दिली आहे. अमित गायकवाड असं डिस्चार्ज दिलेल्या तरुणाचं नाव आहे. तसंच प्रेम ठाकरे (29 वर्ष ) यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. पवन शिंदे, अभिषेक शेटे, सुमित आडतकर, साहिल लावण यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धावताना जमीनीवर कोसळला : अक्षय बिऱ्हाडे या (23 वर्षीय) तरुणानं नवी मुंबईतील बलेगाव कॅम्प येथे पोलीस भरती प्रक्रियेत सहभाग घेतला होता. अक्षय हा जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी होता. भारती ग्रुप नंबर 11 धावपट्टीवर धावत असताना अक्षय जमिनीवर कोसळला. त्यानंतर गंभीर अवस्थेत त्यांला तातडीनं कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून या रुग्णालयात राज्य राखीव दल, पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.

मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट : 500 मीटर धावण्याआधीच अक्षय जमिनीवर कोसळला होता. त्याच्यावर वेळेवर उपचार होत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. शवविच्छेदन प्रक्रिया सुरू असून अक्षयला हृदयविकाराचा झटका आला होता, किंवा त्यानं काही सेवन केलं होतं याचा तपास रुग्णालयाकडून करण्यात येणार आहे. शवविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्यूचं कारण समोर येईल, असं डॉक्टरांनी सांगितलं.

'हे' वाचलंत का :

  1. "अतिरिक्त अर्थसंकल्पाला मान्यता नसताना जीआर काढणे हक्कभंग’’, वडेट्टीवारांचा सरकारवर गंभीर आरोप - Maharashtra Assembly Session 2024
  2. वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणाऱ्या सुपरफास्ट प्रवासात नवं संशोधन! एमआयटीच्या विद्यार्थ्यांनी केली हायपरलूपची निर्मिती - Hyperloop technology research
  3. रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा हवाच; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची मागणी - Ramdas Athawale

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.