ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर कथित प्रियकराची आत्महत्या, मृतदेहाजवळ सापडले दोन मोबाईल - lover Krishna Shirsat suicide

minor girl murder : कल्याण शहरात अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर कथित प्रियकरानं आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या मृतदेहाजवळ पोलिसांना दोन भ्रमणध्वनी देखील आढळून आले आहे. या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

suicide
suicide
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 23, 2024, 11:10 PM IST

ठाणे minor girl murder : कल्याण शहरात एका पडक्या इमारतीत एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलगी 13 जानेवारीपासून बेपत्ता होती. धक्कादायक म्हणजे या मुलीच्या प्रियकरानं देखील रेल्वेसमोर उडी मारत आत्महत्या केली आहे. प्रियकरानंच मुलीची हत्या करून नंतर आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

प्रियकराची रेल्वेखाली आत्महत्या : कृष्णा शिरसाट असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. त्यानं रेल्वेखाली उडी मारत आत्महत्या केलीय. त्यानंतर कल्याण पश्चिमेतील सिंडिकेट परिसरात एका पडक्या इमारतीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर ही मुलगी 13 जानेवारीपासून बेपत्ता असल्याचं समोर आलं.

पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार : मुलीच्या नातेवाईकांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. पडक्या इमारतीत मुलीच्या मृतदेहाशेजारी पोलिसांना दोन मोबाईल सापडले आहेत. त्यातील एक मोबाइल तरुणीचा असून, दुसऱ्या मोबाइलच्या मालकाचा पोलिसांनी शोध घेतला. माहिती मिळाल्यानंतर दुसरा मोबाइल कृष्णा शिरसाटचा असल्याचं उघड झालंय.

प्रियकराची रेल्वेखाली आत्महत्या : पोलिसांनी कृष्णाचा शोध सुरू केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. कृष्णानंही 14 जानेवारीला रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास खडकपाडा पोलीस करत आहेत. कृष्णा हा जालन्याचा रहिवासी आहे. अल्पवयीन मुलीची हत्या कोणी केली? कृष्णा हा या तरुणीचा प्रियकर असल्याचं बोललं जात आहे. त्यानं तिची हत्या करून नंतर आत्महत्या केली, की अन्य कोणी तिची हत्या केली याचा तपास खडकपाडा पोलीस करत आहेत.

हेही वाचा -

  1. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
  2. पुण्यातील FTII मध्ये वादग्रस्त बॅनरबाजी, हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण
  3. ईडी कारवाई सुरू झाली म्हणजे निवडणुका आल्या; ईडी चौकशीवरुन रोहित पवार आक्रमक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.