ETV Bharat / state

खासदार राघव चढ्ढा शिर्डीत साईचरणी नतमस्तक; पाहा व्हिडिओ - RAGHAV CHADHA

आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी आज शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Raghav Chadha
राघव चढ्ढा साईचरणी नतमस्तक (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2024, 4:41 PM IST

शिर्डी : अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक येत असतात. आज आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा देखील दर्शनासाठी आले होते.

मध्यान्ह आरतीलाही लावली हजेरी : आज एकीकडे 'वन नेशन वन इलेक्शन' बिल लोकसभेत सादर केलं जात असताना दुसरीकडे आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी आज शिर्डीत साई समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी राघव चढ्ढा यांनी साईबाबांच्या मध्यान्ह आरतीलाही हजेरी लावली. साई दर्शनानंतर साई संस्थानच्या वतीनं त्यांचा शाल, साई मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.

खासदार राघव चढ्ढा यांनी घेतलं साईबाबांच्या समाधीचं दर्शन (ETV Bharat Reporter)

काय म्हणाले राघव चढ्ढा ? : साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना चढ्ढा म्हणाले की, "मी साईभक्त आहे. साईबाबांचं जेव्हा बोलवणं येतं त्यावेळी मी त्यांच्या दर्शनासाठी येतो. त्याची कोणतीही वेळ ठरलेली नसते. गेल्या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना मी सांगितलं होतं की, पत्नी परिणीतीलाही साई दर्शनासाठी घेवून येईन. परंतु यावेळी काही कारणामुळे परिणीतीला येऊ शकली नाही. मात्र पुढच्या वेळेस दर्शनाला परिणीतीला नक्की घेवून येणार."

पुढच्या वेळी परिणीतीला दर्शनासाठी घेवून येणार : 'वन नेशन, वन इलेक्शन' बिल आज लोकसभेत चर्चासाठी दाखल करण्यात येणार आहे. या प्रश्नावर बोलण्यास राघव चढ्ढा यांनी नकार दिला. देशातील विमानतळांची स्थिती ही बस स्टँडपेक्षा ही वाईट झाली आहे. हा प्रश्न मी राज्यसभा सभागृहातही उठवला आहे. विमान प्रवासाचे दरही गगनाला भिडले आहेत. तो मुद्दा उपस्थित केल्याचं त्यांनी म्हटलं.

राघव चढ्ढा हे साईभक्त असून वेळ मिळेल तेव्हा ते शिर्डीला येतात. अभिनेत्री परिणीतीबरोबर लग्न झाल्यानंतर चढ्ढा यांचा हा चौथा शिर्डी दौरा आहे. मात्र त्यांची पत्नी बरोबर नव्हती. त्यामुळे पुढच्या वेळी परिणीतीला बरोबर घेवून येऊ, असं राघव यांनी सांगितलं.

अभिनेत्री कतरिना कैफ साईचरणी नतमस्तक : सोमवारी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने शिर्डीत येऊन साई समाधीचं दर्शन घेतलं होतं. ऐनवेळी आलेल्या कतरिनाला पाहण्यासाठी मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती. साई मंदिरात साईबाबांची मध्यान्ह आरती सुरु असल्यानं तिला मंदिराच्या बाहेरच उभं रहावं लागलं होतं. मंदिराच्या बाहेरुनच तिनं साई आरतीत सहभाग घेतला होता. चाहत्यांनी ओळखू नये यासाठी कतरिनानं चेहऱ्यावर मास्क परिधान केला होता.

हेही वाचा -

  1. अभिनेत्री कतरिना कैफ साईचणी झाली नतमस्तक, शिर्डीत येऊन घेतलं साई समाधीचं दर्शन
  2. Parineeti Chopra Raghav Chadha Wedding: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लग्नानंतर पहिल्यांदाच सार्वजनिकपणे दिसले एकत्र...
  3. 'अमर सिंग चमकीला'च्या शूटिंगमध्ये परिणीतीला लाईव्ह परफॉर्म करताना पाहून पती राघव चड्ढा झाला होता दंग - Parineeti Chopra

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.