ETV Bharat / state

सिटी बसखाली चिरडून पाच वर्षीय चिमुकलीचा अंत - Nashik Accident News - NASHIK ACCIDENT NEWS

Nashik Accident News : नाशिक शहरात भीषण अपघात झाला आहे. या घटनेत शहर बसनं दिलेल्या धडकेत एका पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Sanvi Sagar Gavai
सानवी सागर गवई (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 10, 2024, 7:29 PM IST

नाशिक Nashik Accident News : नाशिकरोड परिसरात आज सिटी बसच्या धडकेत एका पाच वर्षीय शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडलीय. नाशिकरोड मालधक्का रोडवरील मनपा सिटी लिंक बस डेपोमध्ये हा अपघात झाला. बस डेपोच्या आवारात जिजाबाई गवई यांची चहाची टपरी असून त्यांची नात सानवी सागर गवई (वय 5 वर्ष) तिच्या आजोबांसोबत शाळेतून चहा टपरीवर जात होती. यावेळी सिटीलींक बस चालकानं भरधाव वेगानं तिला मागून धडक दिली. या अपघातात तिच्या डोक्यावरून बसचं चाक गेल्यानं तिचा जागेवर मृत्यू झालाय. तर तिच्या आजोबांचा जीव थोडक्यात बचावला असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मागील दोन दिवसात नाशिक शहरात तीन वाहन अपघाताच्या घटनामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

बस चालक दारूच्या नशेत : बस चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आलं. सदर घटना परिसरात कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. यावेळी काही तरुणांनी बसची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस वेळेवर पोहोचल्यानंतर अनर्थ टळला. पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेतला. या संदर्भात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसात अपघातांच्या घटनेत तिघांचा मृत्यू : नाशिकमध्ये पुन्हा हिट अँड रनची घटना घडली. नाशिकच्या त्र्यंबक रोड वरील पपया नर्सरी जवळ काल रात्रीच्या सुमारास अपघात झाला. रस्त्यावर उभा असलेल्या सरफुद्दीन अन्सारी या युवकाला भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिली. अपघातानंतर युवकाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच युवकाचा मृत्यू झाला. नाशिकच्या बारदान फाटा परिसरात हिट अँड रन प्रकरण घडून अवघे काही तास उलटत नाहीत, तोच पपई नर्सरी जवळ पुन्हा अपघात घडल्यानं नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

हे वाचलंत का :

नाशिकमध्ये हिट अँड रनची घटना, बारदान फाट्याजवळ महिलेला कारची धडक, आरोपी फरार - Nashik Hit and Run

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.