ETV Bharat / sports

...जेव्हा बॉक्सर मेरी कोमनं अवघ्या 4 तासांत 2 किलो वजन केलं होतं कमी; काही मिनिटांत खेळाडू कसं कमी करतात वजन? - vinesh phogat disqualified - VINESH PHOGAT DISQUALIFIED

Mary Kom lost 2 kilos in 4 hours : भारतीय कुस्टीपटू विनेश फोगटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यानंतर खेळाडूंच्या वजनाची बरीच चर्चा होत आहे. भारतीय बॉक्सर मेरी कोमनं एका स्पर्धेत चार तासांत दोन किलो वजन कमी केलं होतं. खेळाडू वजन कमी करतात वाचा सविस्तर. (vinesh phogat disqualified from olympics)

mary kom
बॉक्सर मेरी कोम (IANS Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 7, 2024, 3:49 PM IST

Updated : Aug 7, 2024, 6:33 PM IST

नवी दिल्ली Mary Kom lost 2 kilos in 4 hours : भारताची स्टार कुस्तापटू विनेश फोगटला (vinesh phogat final match) तिच्या वजनामुळं पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर वजनाशी संबंधित नियमांची बरीच चर्चा होत आहे. विनेश फोगटचं वजन काही ग्रॅम जास्त असल्यानं या श्रेणीतून अपात्र ठरविण्यात आलं आहे. यानंतर इतकं वजन कमी करता आलं असतं आणि असं अनेक वेळा घडलं आहे की खेळाडूंनी फार कमी वेळात वजन कमी केलं आणि विशिष्ट श्रेणीत स्थानही मिळवलं अशा चर्चा सध्या सुरु आहेत. भारतीय बॉक्सर मेरी कोम हिनंही काहीस असंच केलं आहे. तिनं चार तासांत दोन किलो वजन कमी केलं होतं. (vinesh phogat overweight)

मेरी कोमचं प्रकरण काय : वास्तविक, मेरी कोमला 2018 मध्ये पोलंडमधील सिलेशियन ओपन बॉक्सिंग स्पर्धेत खेळायचं होतं. त्यावेळी तिला 48 किलो वजनी गटात खेळायचं होतं. परंतु त्यानुसार तिचं वजन खूपच जास्त होतं. श्रेणी निश्चित करण्यासाठी, तिनं वजन कमी केलं. त्यावेळी मेरी कोमनं कॅटेगरीत अपात्र ठरु नये म्हणून अवघ्या चार तासांत तब्बल दोन किलो वजन कमी केलं होतं. तिनं एक तास स्किपिंग केलं आणि त्यामुळं वजन कमी झाल्याचं सांगितलं होतं. यात तिने फक्त वजनच कमी केलं नाही तर 2018 मधील तिचं तिसरे सुवर्णपदकही जिंकलं होतं.

खेळाडू कसं कमी करतात वजन : जेव्हाही असे प्रकार घडतात, तेव्हा ॲथलीट्स अनेक प्रकारे खूप कमी वेळात वजन कमी करतात. यासाठी ते अवघड वर्कआउट करतात आणि त्यासाठी खास कपडे बनवले जातात, जे वर्कआउट करण्यासाठी परिधान केले जातात. त्यामुळं शरीराला भरपूर घाम येतो आणि वजन काही तासांतच कमी होतं. तथापि, तणावसारखे घटक देखील यामध्ये भूमिका बजावतात. या परिस्थितीत, खेळाडू FBT सूट घालतात, ज्यामुळं शरीरात खूप उष्णता निर्माण होते आणि ते परिधान करुन अंघोळ करतात. असं केल्यानं शरीराला खूप घाम येतो आणि वारंवार टॉयलेटला जावं लागतं, असं केल्यानं शरीरातील पाण्याची साठवणूक कमी होते. पाण्याची साठवणूक कमी केल्यानं एकाच वेळी बरंच वजन कमी होतं. याशिवाय पाण्याची साठवणूक कमी करण्याचे उपाय आहेत, ज्यामुळं शरीरातून पाणी काढून टाकलं जातं आणि वजन कमी होतं.

विनेश फोगटच्या प्रकरणात काय झालं : जर आपण विनेश फोगटच्या (vinesh phogat wrestling) प्रकरणी बोललो तर, कुस्तीपटूला 'वेट इन टाइम' खूप कमी मिळते. कुस्तीच्या नियमांनुसार, सामन्यापूर्वी पैलवानांचं वजन केलं जातं आणि जर दोन पैलवान दोन दिवस लढले तर त्यांचं दोन दिवस वजन केलं जातं. नियमानुसार, सामन्याच्या दिवशी सकाळी प्रत्येक कुस्तीपटूचं वजन केलं जातं. पहिल्या वजनाच्या वेळी, कुस्तीपटूंना वजन करण्यासाठी 30 मिनिटं असतात. तुम्ही 30 मिनिटांत अनेक वेळा स्वतःचं वजन करु शकता. परंतु इतर दिवशी वजन करण्यासाठी फक्त 15 मिनिटं असतात. अशा परिस्थितीत इतक्या कमी वेळेत वजन कमी करणं शक्य नाही.

हेही वाचा :

  1. भारताला मोठा धक्का... अंतिम सामन्यात पोहोचलेली कुस्तीपटू विनेश फोगट ऑलिम्पिकसाठी अपात्र, कारण काय? - Paris Olympics 2024
  2. ऑलिम्पिकमधून अपात्र झालेल्या विनेशसाठी पंतप्रधान मोदींची भावनिक पोस्ट, म्हणाले... - PM Modi on Vinesh Phogat

Last Updated : Aug 7, 2024, 6:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.