दुबई ICC Banned USA League : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) अमेरिकेतील राष्ट्रीय क्रिकेट लीगला मोठा धक्का दिला आहे. सचिन तेंडुलकर, वसिकम अक्रम आणि सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांसारख्या दिग्गजांचाही या लीगशी संबंध आहे. नियमांचं उल्लंघन केल्यामुळं आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट लीगवर बंदी घातली आहे. आयसीसीनं पुढील हंगामाला मान्यता देण्यास नकार दिल्याचं सांगितलं जात आहे. कारण यात नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आलं. एका चुकीमुळं या अमेरिकन क्रिकेट लीगचं मोठं नुकसान झालं आहे.
🚨National Cricket League USA banned by ICC🚨
— KAUSHIK (@cricketkaushik) December 10, 2024
A year after establishing stricter guidelines for the sanctioning of T20 and T10 leagues around the world, ICC set a major precedent by clamping down on USA's National Cricket League (NCL) for flouting playing eleven rules pic.twitter.com/UpgnEHOZ0H
नियमांचं उल्लंघन केल्यानं कारवाई : अमेरिकेच्या नॅशनल क्रिकेट लीगमध्ये नियमांचं उल्लंघन केल्यानंतर आयसीसीनं कठोर कारवाई करत लीगवर बंदी घातली आहे. नियमांनुसार, या लीगमधील प्रत्येक संघासाठी 7 अमेरिकन खेळाडू आणि 4 परदेशी खेळाडू असणं अनिवार्य आहे. मात्र संघांनी या नियमाचं उल्लंघन केलं. हा नियम मोडल्याची माहिती आयसीसीला आधीच मिळाली होती. याशिवाय व्हिसाच्या नियमांचंही उल्लंघन करण्यात आलं. आयसीसीनंही उशीर न करता लीगवर बंदी घातली. आयसीसीनं पत्र लिहून अमेरिकेच्या क्रिकेट लीगवर बंदी घालण्याची माहिती दिली. अशा स्थितीत नॅशनल क्रिकेट लीगच्या पुढील हंगामाचं आयोजन केलं जाणार नाही.
🚨 USA's National Cricket League has been banned by the ICC @smit2592 with the full story: https://t.co/QsdnkqVBId pic.twitter.com/lDLEnnDhMJ
— Cricbuzz (@cricbuzz) December 10, 2024
सचिन तेंडुलकरचं खास नातं : 'क्रिकेटचा देव' आणि माजी भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर देखील या लीगचा एक भाग होता. यासंदर्भात माहिती देताना तो स्वत: म्हणाला होता, "क्रिकेट हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रवास आहे. अमेरिकेतील या खेळासाठी अशा रोमांचक वेळी नॅशनल क्रिकेट लीगमध्ये सामील होताना मला आनंद होत आहे." सचिन या लीगमधील मालकी गटाचा भाग आहे.
The ICC has banned the USA’s National Cricket League (NCL) for repeated violations of Playing XI regulations, which mandate at least seven domestic players per team.
— Krishn Kant Asthana (@KK_Asthana) December 10, 2024
Despite this setback, the league garnered attention due to its association with legends like Sachin Tendulkar,… pic.twitter.com/wlj3sDwWh2
अक्रम-रिचर्ड्ससह दिग्गज खेळाडू लीगमध्ये शामिल : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्सचाही अमेरिकन क्रिकेट लीगशी विशेष संबंध आहे. लीगनं या दोन्ही दिग्गजांना राजदूत बनवलं होतं. याशिवाय सुनील गावसकर, सनथ जयसूर्या, व्यंकटेश प्रसाद, झहीर अब्बास, दिलीप वेंगसरकर आणि मोईन खान आदी या लीगशी संबंधित आहेत. या खेळाडूंकडं राष्ट्रीय क्रिकेट लीग संघांचं मार्गदर्शक किंवा प्रशिक्षक म्हणून पाहिलं जाणार होतं.
हेही वाचा :