चेन्नई Virat Kohli Register 100 Fifty : इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये सोमवारी पंजाब किंग्ज (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं पंजाब किंग्ज (PBKS) संघावर दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली यानं 49 चेंडूत 77 धावा केल्या. त्या या धडाकेबाज खेळीनं त्याच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. विराटनं 50 पेक्षा अधिक धावा काढण्यात शतकं ठोकलं आहे. तब्बल 100 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्याचा हा विक्रम करणारा विराट कोहली हा एकमेव भारतीय फलंदाज ठरला आहे.
50 पेक्षा अधिक धावा करण्याचा विराट विक्रम : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीनं सोमवारी चिन्नास्वामी मैदानात चौफेर फटकेबाजी केली. विराट कोहली यानं 44 चेंडूत 77 धावा करुन चिन्नास्वामी मैदानात सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांचं आपल्या फटकेबाजीनं चांगलंच मनोरंजन केलं. यासह विराट कोहलीनं त्याच्या नावावर अनोखा विक्रम केला. विराट कोहलीनं आतापर्यंत 377 टी20 सामने खेळले आहेत. यात विराट कोहलीनं शंभरावं अर्धशतक ठोकलं आहे. आयपीएल टी20 सामन्यात शंभरावं अर्धशतक ठोकणारा विराट कोहली हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
दुसऱ्याच चेंडूवर मिळालं जीवदान : पंजाब किंग्ज संघाविरोधात खेळताना चेन्नईतील मैदानावर सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर विराट कोहलीला जीवदान मिळालं होतं. सॅम करनच्या विराट कोहलीला जीवदान मिळालं. त्यानंतर सातव्या षटकातही त्याला जीवदान मिळालं. त्याचा पुरेपूर फायदा विराट कोहलीनं घेतला.
मुलाच्या जन्मामुळे गमावली कसोटी मालिका : विराट कोहलीला इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका मुलाच्या जन्मामुळे गमवावी लागली. मात्र त्यानंतर संघात आयपीएल टी20 मालिकेत पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीनं जबरदस्त खेळी केली. यावेळी बोलताना विराट म्हणाला, की "आम्ही या दरम्यान देशात नव्हतो, कौटुंबिक कारणामुळे मी दोन महिने परदेशात होतो, जिथं कोणी आम्हाला ओळखत नव्हतं. या दोन महिन्यात मला कुटुंबीयांसोबत वेळ घालवता आला. मला कुटुंबासोबत वेळ घालवता आला, त्याबद्दल देवाचे आभार मानतो," असंही त्यानं यावेळी सांगितलं.
हेही वाचा :