ETV Bharat / sports

उरली सुरली पदकाची आशा संपली, विनेश फोगाटचं अपील सीएएसनं फेटाळलं! - vinesh phogat CAS hearing verdict - VINESH PHOGAT CAS HEARING VERDICT

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटची रौप्यपदक मिळण्याची तसेच ऑलिम्पिक अपात्रतेला आव्हान देणारं अपील सीएएसनं फेटाळलं आहे. त्यामुळे भारतानं हक्काचं एक पदक गमाविलं आहे.

विनेश फोगाटचं अपील
vinesh phogat CAS hearing (Source- IANS)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 14, 2024, 9:48 PM IST

Updated : Aug 14, 2024, 10:21 PM IST

पॅरिस - कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टनं (CAS) पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या फायनलमधील अपात्रतेविरुद्धचे विनेश फोगटचं अपील फेटाळलं आहे. कुस्तीपटू विनेश फोगाटचं 100 ग्रॅम वजन जास्त आढळल्यामुळे ती अंतिम फेरीसाठी अपात्र झाली होती. अशा स्थितीत तिच्याकडून कांस्यपदक पदक काढून घेतल्यानंतर तिनं कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये (CAS) अपील दाखल केलं. त्यावर सीएएसनं निकाल देताना विनेशच्या ऑलिम्पिक अपात्रतेवर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे विनेशला कोणतेही पदक मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (IOA) अध्यक्षा डॉ. पीटी उषा यांनी फोगटचा युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) विरुद्धचा अर्ज फेटाळण्याच्या CAS च्या निर्णयानं धक्का बसल्याच म्हटलं आहे. तसेच त्यांनी सीएएसच्या निकालावर निराशा व्यक्त केली आहे.

पीटी उषा यांनी म्हटले,"आमच्या कायदेशीर प्रतिनिधींनी क्रीडा लवादासमोर त्यांच्या सबमिशनमध्ये योग्यरित्या माहिती दिली. विनेशचा समावेश असलेल्या प्रकरणामुळे खेळाडूंना, विशेषत: महिला खेळाडूंना, शारीरिक आणि मानसिक ताणतणावांना सामोरे जावे लागते. त्यामधून कठोर आणि अमानुष नियम असल्याचं अधोरेखित झालं आहे. खेळाडूंना प्राधान्य देणाऱ्या अधिक न्याय्य आणि वाजवी नियमांची गरज आहे."

  • केवळ 100 ग्रॅम वजन जास्त आढळल्यानं विनेश फोगाटला पदकाला मुकावं लागलं आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमधील नियमांबाबतच जगभरातील खेळाडुंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दुसरीकडं विनेश फोगाटनं कुस्तीमधून यापूर्वीच निवृत्ती जाहीर केली आहे.

हा निकाल म्हणजे आमच्यासाठी खूप दुःखाचा आणि दुर्दैवी आहे. तिनं अंतिम फेरीत प्रवेश केला असता तर आम्ही ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकू शकलो असतो. आम्ही विनेशच्या पाठीशी उभे आहोत. तिला नेहमीच पाठिंबा देऊ-बॉक्सर, विजेंदर सिंह

विनेश फोगाट कधी भारतात परतणार- ऑलिम्पिक संपल्यानंतरही महिला कुस्तीपटू विनेश फोगटनं पॅरिसमध्ये पदकासाठी प्रतिक्षा केली आहे. यापूर्वी विनेशला पदकासाठी आधी 11 ऑगस्ट, त्यानंतर 13 ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागली. ऑलिम्पिकमध्ये गेलेले सर्व खेळाडू मायदेशी परतले आहेत. पण विनेशनं अपात्र घोषित केल्यानंतरही हार मानली नाही. संपूर्ण देशाचं लक्ष सीएएसच्या निकालाकडं लागलं होतं. आता संपूर्ण देश विनेश भारतात कधी परतणार याची वाट पाहत आहे. तिच्या परतीची तारीख, वेळ आणि मार्ग निश्चित करण्यात आला आहे. ही माहिती कुस्तीपटू बजरंग पुनियानं सोशल मीडियावर शेअर केली आहे. बजरंग पुनियानं त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट एक्सवर पोस्ट केलं की, विनेश फोगाट ही 17 ऑगस्ट रोजी सकाळी 1 वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचणार आहे. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर ती पोहोचल्यानंतर धनकोट, बदली झज्जर बायपास मार्गे द्वारका एक्सप्रेसवे मार्गे बलालीला पोहोचणार आहे.

हेही वाचा-

Last Updated : Aug 14, 2024, 10:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.